
फहाद फ़ासिल मॉलीवुडमधील सर्वात मागणी असलेला अभिनेता आहे. त्याने पुष्पा 1 आणि 2 मध्ये ‘भंवर सिंह शेखावत’ ही भूमिका जोरदार वढवली आहे. त्याचीच चर्चा देशभर होत आहे.

त्याचे वडील दक्षिणेतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत. फहाद याने 2002 मध्ये चित्रपट कैयेथुम दोराथपासून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने मध्येच ब्रेक घेतला आणि 2009 मध्ये केरळ कॅफेमधून कमबॅक केले.

त्यानंतर त्याने बँगलोर डेज़, थोंडीमुथलम ड्रिकसाक्शियुम, कुंबलंगी नाईट्स, ट्रान्स, जोजी, मलिक, आर्टिस्ट, आमीन, महेशिन्ते प्रतिकारम या चित्रपटात अभिनयाची छाप सोडली. त्याला केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला.

लाईफस्टाईल आशियाच्या दाव्यानुसार, पुष्पा: द राईज या चित्रपटासाठी फहाद याने जवळपास 3.5 कोटी रुपये घेतले.

तर फिल्मीबीटच्या वृत्तानुसार, पुष्पा: द रूलसाठी फहाद याने त्याच्या फीमध्ये 3.78% वाढ केली. त्याला 8 कोटी रुपये देण्यात आले.

पुष्पा सीक्वल साठी फहाद प्रत्येक दिवशी शुटिंगसाठी 12 लाख रुपये घेत असल्याचा दावा करण्यात येतो.

फहाद फ़ासिल हा आलिशान कारचा फॅन आहे. त्याच्याकडे 1.84 कोटींची Porsche 911 Carrera S ही कार आहे. तर त्याच्या गॅरेजमध्ये 2.35 कोटी किंमतींची रोवर वोग आणि 70 लाखांची मर्सिडीज बेन ई या कार आहेत.