पाणावलेल्या डोळ्यांनी राहुलने भाऊ मुकुल देवला दिला अंतिम निरोप; विंदु दारा सिंहलाही अश्रू अनावर

अभिनेते मुकुल देव यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. मुकुल यांचे खास मित्र विंदु दारा सिंह हे माध्यमांशी बोलताना भावूक झाले होते.

| Updated on: May 25, 2025 | 10:50 AM
1 / 5
'सन ऑफ सरदार'मधील भूमिकेसाठी लोकप्रिय असलेले अभिनेते मुकुल देव यांचं शुक्रवारी 23 मे रोजी निधन झालं. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुकुल यांच्या पार्थिवावर त्यांचे भाऊ आणि अभिनेते राहुल देव यांनी अंत्यसंस्कार केले.

2 / 5
मुकुल देव यांच्या पार्थिवावर दिल्लीतील दयानंद मुक्ती धाम इथं अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी कुटुंबीयांसह इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते. मुकुल यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्यांना भाऊ राहुल देव हात जोडून नमस्कार करताना दिसले.

3 / 5
अभिनेते विंदु दारा सिंह हे मुकुल यांना भावासारखे मानायचे. या दोघांनी 'सन ऑफ सरदार'मध्ये एकत्र काम केलं होतं. मुकुल यांना अखेरचा निरोप देताना विंदु यांना अश्रू अनावर झाले.

4 / 5
"मुकुल अत्यंत प्रेमळ मनाचा होता. त्याचं वजन वाढल्यानंतर अजय देवगण आणि इतरांनी त्याची मदत केली होती. तुमच्या प्रार्थनामध्ये त्याला लक्षात ठेवा", अशा शब्दांत विंदु दारा सिंह यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

5 / 5
मुकुल यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला. सलमान खान, रवी किशन, मनोज बाजपेयी, अजय देवगण यांनी सोशल मीडियाद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत.