AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली

राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली

| Updated on: Oct 18, 2026 | 7:43 PM
Share

राहुल गांधींनी गोव्यातून मोदी, शाह आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर व्होट चोरीचा आरोप केला आहे. काँग्रेसमुळे त्यांना झोप येत नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. मोदी-शाहांना लवकरच याची किंमत चुकवावी लागेल आणि त्यांचा निपटारा केला जाईल, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गोव्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी या तिघांना व्होट चोरीची किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला. राहुल गांधी यांच्या मते, काँग्रेस पक्षाच्या वाढत्या ताकदीमुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना झोप लागत नाहीये. ज्ञानेश कुमार यांचीही हीच अवस्था असल्याचे त्यांनी नमूद केले.

राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या कृत्याबद्दल न्याय मिळेल. काही काळातच आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा निपटारा करू, असे राहुल गांधी म्हणाले. जनतेने याबद्दल घाबरण्याची गरज नाही, कारण काम सुरू आहे आणि त्यांची एक्सपायरी डेट जवळ येत आहे असा दावा त्यांनी केला. काँग्रेस पक्ष या सर्वांचा निपटारा करणार असून, ते यातून वाचू शकणार नाहीत, अशी गॅरंटी राहुल गांधी यांनी दिली.

Published on: Oct 18, 2026 07:43 PM

Follow Us