Rajinikanth Fees : जेलर 2 द्वारे रजनीकांत करणार धमाका, किती घेतलं मानधन ?
रजनीकांत यांची जेलर 2 ही फिल्म रिलीजसाठी तयार आहे. या चित्रपटात 75 वर्षांचा हा स्टार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्यांनी किती मानधन घेतलं, ते जाणून घेऊया.

साउथ सुपरस्टार रजनीकांत जेलर 2 चित्रपटाद्वारे चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी तयार आहेत. वयाच्या 75 व्या वर्षी, ते या फिल्ममध्ये लीड रोलमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता चाहत्यांना या चित्रपटाकडूनही चांगल्या- कलेक्शनची अपेक्षा आहे.
रजनीकांत यांची ही पॅन इंडिया फिल्म 5 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. फिल्मच्या पहिल्या भागानेही खूप चांगली कमाई केली होती आणि 600 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला होता. ही रजनीकांतच्या करिअरची दुसरी आणि तामिळ सिनेमाच्या इतिहासातील तिसरी सर्वाधिक कमाई करणारी फिल्म आहे.
असं मानलं जातंय की जेलर 2 चित्रपटाद्वारे रजनीकांत नवीन रेकॉर्ड सेट करणार असून, हा त्यांच्या करिअरचा आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केलं आहे. परदेशातूनसुद्धा या चित्रपटाची चांगली कमाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ओपनिंग डेला चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगद्वारे 30 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
अभिनेता रजनीकांत यांनी या चित्रपटासाठी भरभक्कम फी घेतली आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचं बजेट 240 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.तर या चित्रपटासाठी साऊथ सुपरस्टार असलेल्या रजनीकांत यांनी 110 कोटी फी घेतली आहे. एवढंच नव्हे तर ते प्रॉफिटमध्येही शेअर घेणार आहे. या सर्वांची बेरीज केली तर ते जवळपास 180 कोटींपर्यंत कमाई करू शकतात.
जेलर 2 चित्रपटात अनेक स्टार्स झळकणार आहेत. या फिल्ममध्ये विनायकन, मिथुन चक्रवर्ती, विद्या बालन, राम्या कृष्णन, योगी बाबू आणि मोहनलाल दिसतील. तसेच, चित्रपटात शिव राजकुमार, ऋतिक रोशन, विजय सेतुपति आणि जैकी श्रॉफचे यांचाही कॅमिओ पाहायला मिळणार आहे.