अजूनही वेळ गेलेली नाही, पवारांनी NDA मध्ये यावं, बड्या केंद्रीय मंत्र्याची खुली ऑफर; राजकारणात खळबळ!
शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष लवकरच एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. पवार गटाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आमच्या पक्षात यावर चर्चा नाही. तसा कोणाचाही प्रस्ताव आलेला नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

परंतु, पवारांचा पक्ष मतदारसंघांच्या पूनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या एनडीए सहभागाबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी शरद पवारांना खुली ऑफरच देऊन टाकली आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही. शरद पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी व्हावे, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. तसेच 2014 किंवा 2019 साली शरद पवार एनडीएमध्ये सहभागी झाले असते तर त्यांचा राष्ट्रपती म्हणून विचार होऊ शकला असता, असंही विधान रामदास आठवले यांनी केलं.

आताही शरद पवारांनी एनडीएमध्ये यायला काही हरकत नाही. त्यांचे आठ खासदार आहेत. त्यांनी जर आज निर्णय घेतला तर त्यांचे आठ खासदार एनडीए सोबत येतील. अजून ही वेळ गेलेली नाहीये. अजूनही पवार साहेबांनी निर्णय घ्यावा एनडीएमध्ये त्यांचं स्वागतच आम्ही करू, अशी खुली ऑफरच रामदास आठवले यांनी दिली.

त्यांचे आठ खासदार आमच्यासोबत राहतील पवार साहेबांसारखा एक सीनियर नेता आमच्या सोबत येईल. याचा आम्हाला अभिमान राहणार आहे. ते आले तर आमच्या एनडीएचा फायदाच आहे, असेही पुढे रामदास आठवले यांनी सांगितले.