
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

परिश्रमाशिवाय पर्याय नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. जुनं विसरून जात नव्याने कामाला सुरुवात करा. घरात काही शुभ कार्याचा योग जुळून येईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लेमन राहील.

प्रवास करताना काळजी घ्याल. एक छोटीशी चूक महागात पडू शकते. धावत वाहन पकडण्याच्या नादात पडू नका. उशीर झाला तरी चालेल हे लक्षात ठेवा. शुभ अंक 42 आणि शुभ रंग जांभळा राहील.

अतिथी देवो भव: लक्षात ठेवा. घरी आलेल्या पाहुण्याचं स्वागत करा. जेवणाचा आग्रह करा. काही महत्त्वाचे खुलासे होतील. त्यामुळे भविष्यात बसणारा फटका टळेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग लेमन राहील.

आर्थिक स्थिती आहे तशीच राहात नाही. भविष्याच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करणंही तितकंच गरजेचं आहे. सावधपणे पावलं उचला. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग जांभळा राहील.

आजचा दिवस आपला आहे लक्षात ठेवून कामाचा धडाका लावा. त्यामुळे कामं झटपट तर पूर्ण होतील. त्याचबरोबर डोक्यावरील ताणही हलका होईल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग हिरवा राहील.

आत्मविश्वास असेल तर अशक्य गोष्टीही शक्य करता येतात. त्यामुळे आळस झटका आणि कामाला सुरुवात करा. आर्थिक स्थितीमुळे एक पाऊल पाठी याल. पण काम करत राहा हा तिढाही सुटेल. शुभ अंक 20 आणि शुभ रंग पिवळा राहील.

कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. प्रवासात काही नवीन ओळखी होतील. नव्या व्यवसायाबाबत माहिती मिळाल्याने गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल. जोडीदाराची साथ मिळेल. शुभ अंक 24 आणि शुभ रंग जांभळा राहील.

कुटुंबात सकारात्मक गोष्टींचं दर्शन होईल. काही धार्मिक कार्यामुळे उत्साहाचं वातावरण राहील. विद्यार्थ्यांना काही चांगले परिणाम दिसून येतील. शुभ अंक 4 आणि शुभ रंग पिवळा राहील.

आपल्या काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे दिवसभर ताण राहील. काही व्यवहारात आर्थिक फटका बसू शकतो. पत्नीकडून काही वस्तूंसाठी तगादा असेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग चंदेरी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)