Gold Loan Rule: सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI ने अचानक बदलले नियम, फायदा होणार की तोटा?
Gold Loan Rule Change: जर तुम्ही सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कर्जदारांना आरबीआयने आता एक मोठी गुडन्यूज दिली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियामक निर्बंधांमुळे पर्सनल लोन मिळवणे आता कठीण झाले आहे. बँका आणि वित्तीय संस्था आता गोल्ड कर्जांना अधिक प्राधान्य देत आहेत.
सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे यामुळे सोन्यावर मिळणाऱ्या कर्जाही जास्त आहे. विशेष म्हणजे देशातील एकूण गोल्ड लोन हे दक्षिण भारतातील राज्यांत घेतले जाते. आता या गोल्ड लोन घेणाऱ्यांसाठी आरबीायने थेट नियमात बदल केला आहे.
नवीन मार्गदर्शक नियमानुसार 'लोन-टू-व्हॅल्यू', जे पूर्वी सोन्याच्या मूल्याच्या ७५ टक्क्यांपर्यंत आधी मर्यादित होते. आता त्यातच वाढ करण्यात आली आहे. आता २.५ लाखपर्यंतच्या कर्जासाठी हे प्रमाण आता ८५ टक्केवर पोहोचले आहे.
पाच लाख रुपयांच्या कर्जासाठी हे प्रमाण आता ८० टक्क्यांवर पोहोचले आहे. या व्यतिरिक्त पाच लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी ७५ टक्केच कायम ठेवण्यात आले. कर्ज पूर्ण केल्यानंचर तारण ठेवलेले सोने जास्तीत जास्त सात कामकाजाच्या दिवसांत कर्जदाराला परत करावं लागते.
जर बँकने असे केले नाही तर त्यांना पाच हजार रुपयांचा दंड भरणे अनिवार्य आहे. हा दंड दररोज पाच हजार रुपयांप्रमाणे मोजला जाणार.