Photo : राहुल गांधी ते राज ठाकरे, मोहन भागवत अन् शरद पवार… सर्व एकत्र; सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नाला राजकारण्यांची मांदियाळी

Revati Sule Wedding : खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहसोहळ्याला राहुल गांधी, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, मोहन भागवत, शरद पवार यांच्यासह राजकारण, उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली.

बापू गायकवाड | Updated on: Jun 20, 2026 | 9:51 PM
1 / 5
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवतीचा विवाहसोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या विवाह सोहळ्याला राजकारण, बिझनेस, मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील मंडळी हजर आहेत.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवतीचा विवाहसोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या विवाह सोहळ्याला राजकारण, बिझनेस, मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील मंडळी हजर आहेत.

2 / 5

रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्याला शरद पवार, देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत, राज ठाकरे, भगवंत मान, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राहुल गांधी, वर्षा गायकवाड, डीएमकेच्या खासदार कनिमोझी, रोहित पवार, ओमर अब्दुल्ला, फारुक अब्दुल्ला, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि कायनात धार या लग्नासाठी पोहचल्या आहेत.

3 / 5

शायना एनसी, खासदार डी राजा, दिग्विजय सिंग, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे, निशिकांत दुबे, जय पवार, धीरज देशमुख, बासुरी स्वराज, अमोल कोल्हे, पूर्वा वळसे पाटील, अनुराग ठाकूर हे नेते लग्नासाठी हजर होते.

4 / 5

सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, मिलिंद नार्वेकर, मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात, विशाल पाटील, शिवानी वडेट्टीवार, सुनील भुसारा, नरहरी झिरवळ, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, संजय राऊत, केसी वेणुगोपाल,अमीन पटेल, अस्लम शेख, मल्लिकार्जुन खरगे आणि हर्षवर्धन सपकाळ हेही नेते हजर आहेत.

5 / 5

बिझनेस आणि मनोरंजन क्षेत्रातून मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबानी, राधिका अंबानी, गौतम अदाणी, प्रीती अदाणी, अनिल अंबानी, अमिताभ बच्चन, करन जोहर यांच्यासह अनेक मंडळी हजर आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us