सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, दागिन्यांवरील हॉलमार्किंग फी वाढल्याने फसवणूकीचा धोका…

सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी हॉलमार्किंग संदर्भात एक महत्वाची बातमी आली आहे. गोल्ड हॉलमार्किंगची फी 45 रुपयांवरुन 75 रुपये प्रति दागिना करण्यात आली आहे. म्हणजे ही दरवाढ ६७ टक्के झाली आहे. यानंतर ज्वेलरी इंडस्ट्रीने नकली हॉलमार्किंग स्टँपच्या वापरचा धोका वाढेल अशी शंका व्यक्त केली आहे.

| Updated on: Oct 01, 2026 | 9:48 PM
1 / 5
ऑल इंडिया जेम एण्ड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलच्या (GJC) मते वाढलेल्या खर्चाने इमानदारीने नियमांचे पालन करणाऱ्या ज्वेलर्सवर शिस्तबद्धेचे वजन वाढू शकते.काही व्यावसायिक हॉलमार्किंगच्या जागी नकली स्टँपचा वापर करुन ग्राहकांची दिशाभूल करु शकतात. खासकरुन टिअर-2, टिअर-3 आणि टिअर-4 शहरात याचा धोका आहे. या शहरात हॉलमार्क आणि  HUID च्या तपासणी संदर्भात जास्त जागरुकता नाही. GJC ने दिलेल्या देशातील सुमारे ८०० जिल्ह्यात केवळ १० टक्के लोकांत BIS Care App संदर्भात पुरेशी जागरुकता नाही.

2 / 5

BIS च्या सुधारित नियमांतर्गत गोल्ड ज्वेलरीच्या हॉलमार्किंगची फी 45 वरुन ₹75 प्रति दागिना अशी केली आहे. हा बदल 14 सप्टेंबर 2026 रोजी अधिसूचित BIS (Hallmarking) Amendment Regulations, 2026 अंतर्गत केला आहे.तर चांदीच्या हॉलमार्किंगची फी ₹35 इतकी आहे. GJC ने ही दरवाढ कमी करुन जुनी ₹45 फी कायम ठेवण्याची मागणी केली आहे. संघटनेने BIS ला हे देखील विचारले आहे की फी वाढवण्याच्या मागे उपकरण, कर्मचारी आणि प्रोसेसिंग आणि स्टोरेजसाठी येणारा अतिरक्त खर्च किती आहे हे विचारले आहे.

3 / 5

ग्राहकांना असे ओळखावे हॉलमार्क - सोन्याचे दागिने खरेदी करताना केवळ हॉलमार्कचे निशान पाहून संतुष्ठ होऊ नये. असली हॉलमार्कवाल्या ज्वेलरीवर BIS चा लोगो, प्युरिटी/ फायनेस ग्रेड आणि 6 अंकी HUID नंबर असतो. HUID ला BIS Care App मध्ये जाऊन Verify HUID पर्यायाद्वारे चेक केले जाऊ शकते. उदाहरणासाठी 22K916 चा अर्थ 22 कॅरेट सोने आणि 91.6% गोल्ड कंटेंट असा असतो. तर 18K750 मध्ये 75% गोल्ड असते. त्यामुळे ज्वेलरी खरेदी करताना बिलासोबत हॉलमार्क आणि HUID ची देखील तपासणी करणे गरजेचे असते.

4 / 5

सरकारी आकड्यांनुसार जुलै 2026 पर्यंत देशात मान्यता प्राप्त Assaying and Hallmarking Centres ची संख्या वाढून 1,577 झाली आहे., जी जुलै 2022 मध्ये 1,220 होती. 2025-26 मध्ये सुमारे 13.22 कोटी ज्वेलरी आर्टिकल्सची हॉलमार्किंग पूर्ण झाली आहे.

5 / 5

GJC च्या अंदाजानुसार नवीन फीने संपूर्ण इकोसिस्टीमवर सुमारे ₹400 कोटींचा अतिरिक्त आर्थिक ओझे पडू शकते. याशिवाय सुमारे ₹80 कोटींचा GST प्रभाव देखील होऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us