AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमली पदार्थ ते देशातील आंदोलन; RSSच्या विजयादशमी मेळाव्यातील डॉ. मोहन भागवतांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

नागपुरातील विजयादशमीच्या उत्सवातील भाषणात डॉ. मोहन भागवत यांनी महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसेच त्यांनी यावेळी तरुणांना महत्वाचा संदेश दिला.

| Updated on: Oct 20, 2026 | 10:42 AM
Share
नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या विजयदशमी उत्सव कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी उपस्थित स्वयसेवकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशाच्या विविध विषयावर भाष्य केलं.

1 / 6
मोहन भागवतांनी विजयादशमीच्या भाषणात अमली पदार्थांचे व्यसन ही गंभीर राष्ट्रीय समस्या असल्याचे म्हटले. नव्या पिढीला व्यसनाधीन करणाऱ्या प्रवृत्तींपासून दूर ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांमध्ये योग्य-अयोग्य ओळखण्याची आणि विवेकपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता विकसित करावी, असा सल्ला देखील त्यांनी दिला.

2 / 6
मोहन भागवत पुढे म्हणाले, कुटुंबातील ज्येष्ठांकडून आणि पालकांकडून मिळणाऱ्या संस्कारांची भूमिका महत्त्वाची आहे. शालेय अभ्यासक्रमातून आणि सामाजिक वातावरणातून मिळणारे संस्कार कमी होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली'.

3 / 6
सोशल मीडियाबाबत भागवत म्हणाले, 'सोशल मीडियाच्या माहितीचा योग्य-अयोग्यतेचा विचार न करता स्वीकार केल्याने दुष्परिणाम होऊ शकतात. ओटीटी मंचांवरील आशयाच्या संदर्भात आवश्यक नियम आणि उपाययोजनांचा शासनाने विचार करावा'.

4 / 6
व्यसनाच्या समस्येवर भागवत म्हणाले, व्यसनाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने वेळीच प्रयत्न सुरू करावेत. व्यसनमुक्तीसाठी शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. देशभरात व्यसनांविरोधात व्यापक जनजागृती आणि प्रतिबंधात्मक अभियान राबविण्यासाठी संघाचे स्वयंसेवक प्रयत्न करतील'.

5 / 6
देशात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. त्यावर ते म्हणाले, 'परस्परांतील मतभेद अधिक तीव्र करून मनभेद निर्माण करणे, समस्यांच्या संदर्भात अन्यायग्रस्त असल्याची भावना सतत बळकट करणे आणि देशातील व्यवस्थांविषयी अविश्वास निर्माण करणे, ही अशा शक्तींची कार्यपद्धती असते. त्यातून कलह, तीव्र असंतोष, फूट पाडणे, अव्यवस्था आणि अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. भारताला दुबळे ठेवू इच्छिणाऱ्या जागतिक शक्तीही कधीकधी अशा परिस्थितीचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात'.

6 / 6
Follow Us
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी...
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी सजलेला गाभारा पाहून भाविक मंत्रमुग्ध
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर येताच खळबळ
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत