
अहान पांडे आणि अनीत पड्डा स्टारार रोमँटिक म्यूजिककल ड्रामा सैयाराला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाने जगभरात 500 कोटीचा आकडा पार केला आहे.

सैयाराच्या जबरदस्त यशाने अहान आणि अनीतला स्टार बनवलय. दोन्ही कलाकार आपल्या पहिल्या चित्रपटापासून स्टार बनलेत. अनीत पड्डाने सैयारा चित्रपटाचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. सोबतच तिने एक शानदार कॅप्शन सुद्धा लिहिलं आहे.

अनीतने भरपूर फोटो शेअर करताना लिहिलय की, माझी धूंध कमी होतेय. मला फक्त इतकच सांगायचय की, मी तुझ्यावर प्रेम करते.

"तू मला जे इतकं प्रेम दिलयस, ते मला भारी पडतय. मला समजत नाहीय की, ते परत देण्याशिवाय काय करु" असं अनीतने लिहिलय. "मला भिती आहे की, पुढे काय होणार?. माझ्याकडे जे काही आहे, ते भले छोटासा हिस्सा का असेना, मी ते सर्वांसमोर मांडेन"

अनीतने लिहिलय की, "जर हे तुम्हाला हसवतं, रडवतं, किंवा अशा कुठल्या गोष्टीची आठवण करुन देतं, जे तुम्ही विसरलायत, जर हे तुमच्या एकटेपणाची जाणीव कमी करतं, तर कदाचित मीच आहे"