
केंद्र सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या अग्नीपथ योजनेवरून देशात चांगलेच वादंग उत्याहाळे आहे. या योजनेवरून तरुणांनी केंद्र सरकारच्य विरोधात आंदोलन करत असतानाच विरोधकही या योजनेच्या विरोधात एकवटले आहेत.

या सत्याग्रहात आंदोलनात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधीही सहभागी झाले आहेत. ही योजना विद्यार्थ्यांच्या हिताची नसल्याने सरकारने तातडीने मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसही अग्निपथ योजनेवरून पूर्णपणे विद्यार्थ्यांसोबत असल्याचे दाखवत सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. या योजनेच्या निषेधार्थ काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते जंतरमंतरवर सत्याग्रह करत आहेत.

काँग्रेस सत्याग्रह आंदोलंनामुळे जंतरमंतरवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निमालीशकरी दल तैनात केले आहे.

केंद्र सरकार गरीब आणि तरुणांसाठी काम करत नाही तर मोठ्या उद्योगपतींसाठी काम करत आहेअशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. दुसरीकडे, राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आणि म्हटले की, वारंवार नोकऱ्यांची खोटी आशा दाखवून त्यांनी तरुणांना बेरोजगारीच्या 'अग्नीपाथ'वर चालण्यास भाग पाडले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी भाजपच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात जंतरमंतरवर 'सत्याग्रहा'मध्ये.सहभागी झाल्या आहेत. आम्ही देशातील तरुणांच्या पाठीशी, त्यांच्या भविष्यासाठी उभे आहोत.असे ट्विट काँग्रेसच्या अधिकृत ट्विटरवर करण्यात आले आहे.

या योजनेच्या विरोधात देशभरातील तरुणाईही रस्त्यावर उतरली असून अनेक शहरे आणि शहरांमधून हिंसाचाराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.