‘शाळा’ चित्रपटातल्या ‘मुकुंद’ने प्रसिद्ध अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; ‘आई कुठे काय करते’मध्ये साकारलीये भूमिका

'शाळा' या चित्रपटात मुकुंदची भूमिका साकारलेला अभिनेता अंशुमन जोशीने प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीशी लग्न केलं आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

| Updated on: Mar 08, 2026 | 3:49 PM
1 / 6
2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शाळा' या चित्रपटातला मुकुंद तुम्हाला आठवतोय का? हा चित्रपट त्यावेळी चांगलाच गाजला होता आणि त्यातील मुकुंदच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेमाचा वर्षाव केला होता. तोच मुकुंद आता मोठा झाला असून त्याने प्रसिद्ध अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधली आहे.

2 / 6
अंशुमन जोशीनं मुकुंदची भूमिका साकारली होती. नुकताच त्याचा लग्नसोहळा पार पडला आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री अपूर्वा गोरेशी त्याने लग्न केलं आहे. या लग्नाचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

3 / 6
श्री व सौ.. असं कॅप्शन लिहित दोघांनी लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या लग्नात अपूर्वाने हिरव्या आणि जांभळ्या रंगाची साडी नेसली होती, तर अंशुमनने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, त्यावर पिवळी धोतर आणि शाल घेतला होता.

4 / 6
ग्रहमक विधीसाठी अपूर्वाने तिच्या आईच्या लग्नातला 40 वर्षे जुना शालू नेसला होता. तो शालू नेसल्यावर आईलाही भरून आल्याचं तिने म्हटलंय. जांभळ्या आणि लाल रंगाच्या शालूमध्ये अपूर्वा खूपच सुंदर दिसत होती.

5 / 6
अपूर्वा गोरेनं 'आई कुठे काय करते' या गाजलेल्या मालिकेत ईशाची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच अंशुमन आणि अपूर्वाचा साखरपुडा पार पडला होता. तेव्हाच या दोघांचं नातं जगजाहीर झालं होतं.

6 / 6
मेहंदीच्या कार्यक्रमात दोघांनी एकाच रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते. अंशुमनने 'फास्टर फेणे', 'फुंतरू', 'फोटोकॉपी' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

Follow Us