PHOTO : शिर्डी साई मंदिरात अलोट गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा
शिर्डीत ठिकठिकाणी सर्व नियमांचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. (Shirdi Sai temple social distancing rules break)
Follow us
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नियम अटींसह राज्यातील मंदिरे सुरु करण्यात आली. यानंतर पहिल्याच रविवारी शिर्डी साई मंदिर आणि परिसरात अलोट गर्दी पाहायला मिळाली.
धार्मिकस्थळे सुरु करताना नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र शिर्डीत ठिकठिकाणी सर्व नियमांचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
आज रविवार असल्याने शिर्डीत हजारो भाविकांनी गर्दी केली. अनेक भाविक विना-मास्क रांगेत उभे असल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन शिर्डी साई संस्थानकडून करण्यात येत आहे. ऑनलाइन पास घेऊन दर्शन बुक करा, असेही आवाहन करण्यात येत आहे.
दररोज फक्त 6 ते 8 हजार भाविकांना दर्शन देण्याची सुविधा शिर्डी साई संस्थानाकडून करण्यात आली आहे. मात्र, तरीही सध्या दररोज 9 ते 10 हजार भाविक दर्शन घेत आहेत.
मात्र भाविक ऑनलाईन बुकींग न करता ऑफलाईन पास घेत असल्याने दर्शन व्यवस्था कोलमडली आहे.
साई संस्थानकडून जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
आरतीच्या अगोदर मंदिर साफसफाईच्या वेळेत कपात करण्यात आली आहे. जास्त सफाई कर्मचारी लावून वेळेची बचत करण्याचा प्रयत्न आहे.