Forts in Maharashtra : पुण्या- मुंबईपासून अगदी जवळचा, इतिहासाने समृद्ध अन् निसर्गाने नटलेला हा किल्ला एकदा तरी पाहाच!

पूर्वी कोंढाणा नावाने ओळखला जाणारा हा किल्ला तानाजी मालुसरे यांच्या शौर्यामुळे इतिहासात अजरामर झाला. पुण्यापासून साधारण 35 किलोमीटर अंतरावर असलेला हा ऐतिहासिक गड ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी लोकप्रिय आहे.

| Updated on: Oct 13, 2026 | 7:37 PM
1 / 8
सिंहगड म्हणजेच कोंढाणा : पुण्याच्या नैऋत्येला 35 किमी अंतरावर असलेला सिंहगड पुर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जात होता.सह्याद्रिच्या डोंगरमाथ्यावर वसलेल्या या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

सिंहगड म्हणजेच कोंढाणा : पुण्याच्या नैऋत्येला 35 किमी अंतरावर असलेला सिंहगड पुर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जात होता.सह्याद्रिच्या डोंगरमाथ्यावर वसलेल्या या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

2 / 8

तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा :1670 मध्ये मुघलांकडून किल्ला परत मिळवण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी मोहिमेचं नेतृत्व केलं. या लढाईत त्यांनी प्राणांचं बलिदान दिलं.त्यांच्या शौर्यामुळे सिंहगडाचा इतिहास आजही अभिमानाने सांगितला जातो.

3 / 8

गड आला पण सिंह गेला :तानाजी मालुसरे यांच्या निधनाची बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांना मोठं दुखं झालं.या दुर्दैवी घटनेशी जोडलेलं 'गड आला पण सिंह गेला' हे वाक्य आजही तानाजींच्या त्यागाची आठवण करून देतं.

4 / 8

पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा :सिंहगडावर पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा हे दोन प्रमुख प्रवेशद्वार आहेत. भक्कम तटबंदी आणि बुरूजांमुळे किल्ल्याच्या जुन्या संरक्षणव्यवस्थेची कल्पना येते.

5 / 8

गडावरून दिसतो सह्याद्रीचा सुंदर नजारा :सिंहगडाच्या माथ्यावरून सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि हिरव्यागार खोल दऱ्यांच विहंगम दृश्य दिसतं. पावसाळ्यात धुकं,हिरवाई आणि धबधब्यांमुळे परिसरांच सौंदर्य आणखी खुलतं.

6 / 8

सिंहगडावर ट्रे्किंगचा अनुभव :सिंहगड गावातून जाणार ट्रेक साधारण 2.7 किमीचा आहे. तो पूर्ण करण्यासाठी 1.30 ते 2 तास लागू शकतात. कल्याण दरवाज्याचा मार्ग अधिक कठीण आहे. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण खास आहे.

7 / 8

लोकमान्य टिळकांचा ऐतिहासिक वाडा :सिंहगडावर लोकमान्य टिळकांचा ऐतिहासिक वाडा पाहायला मिळतो. प्राचीन मंदिरे, तटबंदी आणि ऐतिहासिक वास्तुंमुळे गडाची सफर महत्त्वाची ठरते

8 / 8

सिंहगडावर कसं पोहोचायचं :पुण्याहून सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत खासगी वाहन, बस किंवा शेअर कॅबने जाता येतं. स्वारगेटहूनही बसची सुविधा आहे. पायथ्यापर्यंत पायी ट्रेक करता येतो किंवा शेअर जीपने गडाच्या माथ्यापर्यंत जाता येतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us