Virat Kohli : आता पण एल्गोरिदमने Like केलं का? विराटने एका जर्मन मुलीचा फोटो लाईक केला, त्यावरुन नवीन वादळ, कोण आहे ती?

Virat Kohli : मागच्यावर्षी विराट कोहलीकडून अभिनेत्री अवनीत कौरचा फोटो लाईक झाला होता. त्यावरुन सोशल मीडियावर मोठा वाद झालेला. विराटने स्वत: इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकून या बद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. आता सुद्धा अशीच घटना घडली आहे.

| Updated on: Apr 17, 2026 | 9:44 AM
1 / 10
 आयपीएल 2026 मध्ये विराट कोहली टीमसाठी दमदार कामगिरी करतोच आहे. त्याचवेळी सोशल मीडियावरील त्याच्या एक्टिविटीने फॅन्स हैराण होतायत. मागच्यावर्षी अभिनेत्री अवनीत कौरचा एक ग्लॅमरस फोटो विराट कोहलीच्या अकाऊंटवरुन लाइक करण्यात आला होता.

आयपीएल 2026 मध्ये विराट कोहली टीमसाठी दमदार कामगिरी करतोच आहे. त्याचवेळी सोशल मीडियावरील त्याच्या एक्टिविटीने फॅन्स हैराण होतायत. मागच्यावर्षी अभिनेत्री अवनीत कौरचा एक ग्लॅमरस फोटो विराट कोहलीच्या अकाऊंटवरुन लाइक करण्यात आला होता.

2 / 10

त्यावेळी सोशल मीडियावर या फोटोचा स्क्रीनशॉट आगीसारखा व्हायरल झाला होता. त्यावेळी विराट कोहलीने इन्स्टाग्राम स्टोरीवर या फोटो बद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. फीड साफ करताना एल्गोरिदमने चुकून इंटरॅक्शन रजिस्टर केलं. आता पुन्हा एकदा अशीच घटना पहायला मिळाली आहे.

3 / 10

अलीकडेच विराट कोहलीने जर्मन इन्फ्लुएन्सर लिजलाजच्या जुन्या इन्स्टाग्राम पोस्टला लाइक केलय. हे लाइक पाहून फॅन्सकडून मीम्स आणि जोक्स सुरु झाले आहेत. lizlaz_tv म्हणून लिजलाजचं इंस्टाग्राम हँडल आहे. ती विराट कोहलीची मोठी फॅन आहे.

4 / 10

ती एका इंटरव्यूमध्ये बोलली होती की, विराट तिचा फेवरेट क्रिकेटर आहे. मी त्याची फॅन आहे. काही रिल्समध्ये तिने आरसीबीची जर्सी परिधान केली होती. याच इन्फ्लुएन्सरने 30 जानेवारीला एक फोटो पोस्ट केला होता. त्यावर विराटचं लाइक आहे.

5 / 10

हैराण करणारी बाब म्हणजे विराट तिला फॉलो करत नाही. पण तरीही इंटरॅक्शन रिजस्टर झालय. फॅन्सनी लगेच या लाइकला मागच्यावर्षीच्या घटनेशी जोडलं आहे. ज्यावेळी विराटने अवनीत कौरची पोस्ट अजाणतेपणी लाइक केली होती.

6 / 10

आता लिजलाजच्या लाइकवरुन फॅन्सनी सोशल मीडियावर मजेशीर रिएक्शन्स पोस्ट केल्या आहेत. 'आता एल्गोरिदमचा अजून एक पॅराग्राफ लोड होतोय' असं एका युजरने लिहिलय.

7 / 10

दुसऱ्या युजरने म्हटलय 'विराट भाई आता सुद्धा मुलींचे फोटो लाइक करतोय, अनुष्काला सांगा'. आता हे लाइक जाणीवपूर्वक केलय की, एल्गोरिदममुळे चुकून झालय हे माहित नाही. सोशल मीडियावर यावरुन वादविवाद सुरु आहेत.

8 / 10

लिजलाज एक जर्मन सोशल मिडिया क्रिएटर, ट्रॅव्हल व्लॉगर, फूडी आणि सिंगर आहे. तिचं दक्षिण आफ्रिकेसी खास कनेक्शन आहे. ती विशेष करुन ट्रॅव्हल आणि कल्चर व्लॉग्स बनवते.

9 / 10

भारतात तिची खास फॅन फॉलोइंग आहे. कारण ती भारतीय संस्कृती, स्ट्रीट फूड, मुंबई, बंगळुरु, गोवा, दिल्ली, हरयाणा येथील अनुभव शेअर करते.

10 / 10

लिजलाजने भारताशिवाय दक्षिण आफ्रिका, कोरिया, वियतनाम, श्रीलंका, थायलँड, मालदीव सारख्या देशांचा दौरा केला आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 4 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us