
दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेशच लवकरच लग्न होणार आहे. 10 ते 12 डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या या विवाह सोहळ्यात जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी होणार आहेत.

कीर्ती मागच्या 15 वर्षांपासून बिझनेसमॅन अँटनी थाटिल सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आता दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, किर्ती दोन पद्धतीन लग्न करणार आहे.

असं म्हटलं जातय की, किर्ती आणि अँटनी आधी हिंदू आणि नंतर ख्रिश्चन पद्धतीने विवाह करणार आहे. दोन्ही पद्धतीने लग्न एकाच दिवशी होईल.

हिंदू पद्धतीने विवाहासाठी किर्तीने पारंपारिक Madisar साडी निवडली आहे. सॉफ्ट पेस्टल कलरची ही साडी आहे. ख्रिश्चन वेडींगसाठी किर्तीने क्रीम कलरचा ड्रेस निवडला आहे.

10 डिसेंबरला किर्ती आणि अँटनीच्या लग्नाचे विधी सुरु होतील. 11 डिसेंबरला संगीत सेरेमनी आहे. लग्नानंतर दोघे कसिनोमध्ये पार्टी करणार आहेत.