Abhishek Sharma: अभिषेक शर्माने आरसीबीविरुद्ध 5 षटकार मारले आणि इतिहास रचला, काय ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्माने झंझावाती खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांना सळो की पळो करू सोडलं. त्याने 5 षटकारांच्या मदतीने 22 चेंडूत 56 धावांची खेळी केली आणि इतिहास रचला.

| Updated on: May 22, 2026 | 9:18 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धेत अभिषेक शर्मा फलंदाजीला आला की काही ना काही विक्रम मोडणार हे ठरलेलं असतं. आरसीबीविरुद्धच्या सामन्यातही तसंच झालं. त्याने 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तसेच 22 चेंडूत 56 धावा करून बाद झाला.  (Photo: IPL/BCCI)

2 / 5
अभिषेक शर्माने अर्धशतकी खेळती 5 षटकार आणि 4 चौकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 254 पेक्षा अधिकचा होता. या खेळीत त्याने एक मोठा विक्रम रचला. आयपीएल स्पर्धेत एखाद्या भारतीयाची ही पहिलीच कामगिरी ठरली आहे.  (Photo: IPL/BCCI)

3 / 5
आयपीएलच्या दोन पर्वात 40पेक्षा अधिक षटकार मारणारा अभिषेक शर्मा हा पहिला भारतीय ठरला आहे. त्याने 2024 मध्ये 42 षटकार मारले होते. त्यानंतर आता 2026 मध्ये 43 षटकार मारले आहे. यात आणखी भर पडेल यात काही शंका नाही. आयपीएल तीन पर्वात 40 पेक्षा अधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.  (Photo: IPL/BCCI)

4 / 5
आयपीएलच्या पर्वात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वैभव सूर्यवंशी आघाडीवर आहे. त्याने 53 षटकार मारले आहेत. तर 43 षटकारांसह अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. फिरकीविरूद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम अभिषेकच्या नावावर आहे. त्याने एकूण 18 षटकार मारले आहेत.  (Photo: IPL/BCCI)

5 / 5
अभिषेक शर्माने आयपीएलच्या इतिहासात सातव्यांदा 250 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केले. हा पराक्रम करणारा एकमेव खेळाडू आहे. निकोलस पूरनने पाच सामन्यांमध्ये असे केले आहे. वैभव सूर्यवंशी, ट्रेव्हिस हेड आणि कायरोन पोलार्ड यांनी प्रत्येकी चार वेळा हा पराक्रम केला आहे. (Photo: IPL/BCCI)

Follow Us