IPL 2026: अभिषेक शर्मावर विश्वास टाकणं धोक्याचं! सलग चार चुकांमुळे पोलखोल
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Eliminator: आयपीएल 2026 स्पर्धेतील एलिमिनेटर अर्थात करो या मरोच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात 47 धावांनी पराभव झाला आणि स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. इतकंच काय तर अभिषेक शर्माच्या अपयशाचं पितळही उघडं पडलं आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचं आव्हान संपुष्टात आलं आहे. एलिमिनेटर फेरीत पराभव होताच स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सने विजयासाठी 243 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हैदराबादचा संघ फक्त 196 धावा करू शकला. या पराभवानंतर अभिषेक शर्माच्या कामगिरीवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Photo: IPL/BCCI)

अभिषेक शर्मा राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात खातंही खोलू शकला नाही. जोफ्रा आर्चरने त्याला दुसऱ्या चेंडूवरच तंबूचा रस्ता दाखवला. अभिषेक शर्मा चौथ्यांदा प्लेऑफमध्ये अपयशी ठरला आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्याच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. (Photo: IPL/BCCI)

अभिषेक शर्माची प्लेऑफमधील कामगिरी निराशाजनक असल्याचं अधोरेखित झालं आहे. अभिषेकने आतापर्यंत प्लेऑफमध्ये 4 सामने खेळले आणि 17 धावा केल्या. त्याची फलंदाजीची सरासरी 4.25 इतकी आहे. तीनवेळा तर दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. (Photo: IPL/BCCI)

अभिषेक शर्माने 2024 मध्ये केकेआरविरुद्ध क्वॉलिफायर सामन्यात फक्त 3 धावा केल्या होत्या. दुसऱ्या क्वॉलिफायर फेरीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध 12 धावा करून बाद झाला. आयपीएल 2024 अंतिम फेरीत केकेआरविरुद्ध 2 धावा करू शकला. तर आयपीएल 2026 मध्ये एलिमिनेटर फेरीत अभिषेक शर्मा खात न खोलता बाद झाला. (Photo: IPL/BCCI)

अभिषेक शर्माची आयपीएल 2026 स्पर्धेत चांगली कामगिरी राहिली. डावखुऱ्या फलंदाजाने 43 षटकार मारत 563 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट हा 204.74 चा राहिला. पण बाद फेरीत त्याची बॅट काही चालली नाही. (Photo: IPL/BCCI)