आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना स्टार खेळाडू झाला वडील, गेल्या वर्षी केला होता दुसरा निकाह
आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असून प्रत्येक सामन्यानंतर उलथापालथ होताना दिसत आहे. गुजरात टायटन्सने या स्पर्धेत संमिश्र कामगिरी केली आहे. असं असताना गुजरात टायटन्सच्या खेळाडूच्या घरी नवा पाहुणा आला आहे. त्याने सोशल मीडियावर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू आहे आणि गुजरात टायटन्सचा स्टार फिरकीपटू राशीद खान फॉर्मात परतत असल्याचं दिसत आहे. असं असताना त्याला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. त्याच्या घरी बाळ जन्माला आलं आहे. ही माहिती त्याने सोशल मीडियावरून दिली. (PHOTO CREDIT- PTI)

राशीद खानने आपल्या मुलाचं नाव अझलान खान ठेवलं आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने लिहिलं की, "अल्हम्दुलिल्लाह, माझ्या छोट्या राजकुमारा, जगात तुझे स्वागत आहे. आम्हाला तुमच्या प्रार्थनेत ठेवा." (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

राशीद खानने 3 ऑक्टोबर 2024 रोजी दुसरं लग्न केलं होतं. त्याने अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे पश्तून रितीरिवाजानुसार लग्न केलं. राशीदसोबत त्याच्या तीन भावाचंही निकाह झाला होता. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

राशीद खानने 2 ऑगस्ट 2025 रोजी दुसरा निकाह केल्याचं जाहीर केलं होतं. मिडिया रिपोर्टनुसार, राशीद खानची दुसरी पत्नी यूके बेस्ड अफगाणी आहे. पण पहिली पत्नी त्याच्यासोबत आहे की नाही हे अस्पष्ट आहे. (PHOTO CREDIT- PTI)

राशीद खानने आयपीएल 2026 स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने खेळले असून एकूण 6 विकेट घेतल्या आहेत. या स्पर्धेत त्याने गुजरात टायटन्ससाठी एकदा कर्णधारपदही भूषवलं आहे. या सामन्यात शुबमन गिल खेळला नव्हता. (PHOTO CREDIT- PTI)