MIW vs RCBW: 24 पैकी 19 चेंडू निर्धाव, आरसीबीच्या 6.2 फूट गोलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यात केला कहर

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने मुंबईला 154 धावांवर रोखलं. या सामन्यात आरसीबीकडून नादीन डी क्लार्कने भेदक गोलंदाजी केली. तसेच आणखी एक गोलंदाज प्रभावी ठरली. 4 षटकात म्हणजेच 24 पैकी 19 चेंडू निर्धाव टाकले आणि 1 विकेट काढली.

| Updated on: Jan 09, 2026 | 10:28 PM
1 / 5
वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईला 154 धावांवर रोखण्यात यश आलं. आरसीबीकडून नादीन डी क्लार्कने भेदक गोलंदाजी केली. तिने चार विकेट काढल्या. तर लॉरेन बेल आणि श्रेयंका पाटीलने प्रत्येकी एक विकेट घेतली. (Photo: RCB Twitter)

2 / 5
आरसीबीकडून खेळणारी इंग्लंडची वेगवान गोलंदाज लॉरेन बेलने तिच्या पदार्पणाच्या सामन्यातच शानदार कामगिरी केली. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. मुंबईच्या फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. (Photo: RCB Twitter)

3 / 5
लॉरेन लॉरेन बेलने सामन्याची सुरुवात निर्धाव षटकाने केली. या षटकात एकही धाव फलंदाजांना काढता आली नाही. तिच्या पहिल्या दोन षटकांमध्ये एकूण 11 डॉट बॉल होते. मुंबई इंडियन्सची सलामीवीर अमेलिया केर आणि जी कमलिनी यांच्यावर प्रचंड दबाव आला होता . (Photo: RCB Twitter)

4 / 5
लॉरेन बेलने तिच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 14 धावा दिल्या. यात तिने 19 डॉट चेंडू टाकले आणि एक विकेटही घेतली.  बेलच्या गोलंदाजीमुळे एमआयला सुरुवातीच्या षटकांमध्ये धावा करण्यापासून रोखले. त्यामुळे पॉवरप्लेमध्ये स्कोअरिंग रेट खूपच कमी राहिला . (Photo: WPL Twitter)

5 / 5
लॉरेन बेलची उंची 6 फूट 2 इंच असल्याने तिच्यासाठी ही एक मोठी फायद्याची बाब ठरली. हार्ड लेंथवरून गोलंदाजी करताना तिला अतिरिक्त उसळी मिळत होती.  ज्यामुळे फलंदाजांना खेळणे कठीण झाले. या सामन्यात तिची उंची आणि अचूक लाईन आणि लेंथने मुंबईच्या फलंदाजीला धक्का दिला . (Photo: WPL Twitter)