फक्त 12 सामन्यांची कारकीर्द! आता Asian Games स्पर्धेत क्रिकेट खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी
जापानमध्ये एशियन गेम्स स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी गामिनी डिसिल्वा याच्या खांद्यावर आहे. गामिनी 16 वर्षे बीसीबीचे पिच क्यूरेटर होते.

एशियन गेम्स 2026 स्पर्धेला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद हे जापानकडे आहे. या स्पर्धेत क्रिकेट स्पर्धाही होणार असून भारतीय संघाकडून गोल्ड मेडलची अपेक्षा आहे. तुम्हाला माहिती आहे का? या स्पर्धेसाठी खेळपट्टी कोण तयार करणार ते.. (Photo: X)
एशियन गेम्स 2026 स्पर्धेतील क्रिकेट खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी गामिनी डिसिल्वा यांच्या खांद्यावर आहे. गामिनी श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी श्रीलंकेसाठी 12 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 341 धावा केल्या असून 8 विकेट काढल्या आहे. (Photo: X)
गामिनी डिसिल्वा याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पंच म्हणून भूमिका बजावली होती. त्याने 11 कसोटी, 51 वनडे आणि 4 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी केली आहे. यात 3 कसोटी, 21 वनडे आणि 2 टी20 सामन्यात मैदानी पंच होते. (Photo: X)
पंचगिरी सोडल्यानंतर गामिनी डिसिल्वा यांनी पिच क्यूरेटर म्हणून भूमिका बजावण्यास सुरूवात केली. पिच क्यूरेटर म्हणून गामिनी डिसिल्वा यांचा बांगलादेशसोबत खास नातं आहे. बांगलादेशमध्ये त्यांनी 16 वर्षे पिच क्युरेटर म्हणून काम पाहिलं. (Photo: X)
गामिनी डिसिल्वा यांच्याकडे पिच क्यूरेटर म्हणून दांडगा अनुभव आहे. आता अनुभवाच्या जोरावर एशियन गेम्स स्पर्धेत खेळपट्ट्या तयार करणार आहेत. (Photo: X)