IND vs AFG Test : टीम इंडियासाठी टेस्टमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, केएल राहुल कितव्या स्थानी?

Most Runs vs Afghanistan By India In Test : टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना हा 2018 साली खेळवण्यात आला होता. त्यानंतर आता उभयसंघात 6 जून पासून एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. या निमित्ताने टीम इंडियासाठी अफगाणिस्तान विरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घ्या.

| Updated on: Jun 03, 2026 | 10:01 PM
1 / 5
माजी सलामीवीर फलंदाज शिखर धवन याच्या नावावर अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडियासाठी सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. धवनने 2018 साली 107 धावा केल्या होत्या. धवनने या खेळीत  3 षटकार आणि 19 चौकार लगावले होते. (Photo Credit : PTI)

2 / 5
धवन व्यतिरिक्त माजी फलंदाज मुरली विजय यानेही या सामन्यात शतक ठोकलं होतं. मुरलीने 105 धावा केल्या होत्या. मुरलीने या खेळीत 15 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. अफगाणिस्तान  विरुद्ध धवन आणि विजय या दोघांनीच शतक झळकावलं आहे. (Photo Credit : Bcci Photo)

3 / 5
हार्दिक पंड्या याने अफगाणिस्तान विरुद्ध याच सामन्यात 71 धावा केल्या होत्या. हार्दिकने या खेळीत 10 चौकारांच्या मदतीने 40 धावा केल्या होत्या. मात्र हार्दिक सध्या कसोटी संघाचा भाग नाही. (Photo Credit :  Twitter/@ICC)

4 / 5
केएल राहुल याने हार्दिक प्रमाणे अफगाणिस्तान विरुद्ध 2018 साली झाल्या सामन्यात 8 चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या होत्या. आता केएल  अफगाणिस्तान विरुद्ध उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
माजी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने अफगाणिस्तान विरुद्ध 35 धावांची खेळी केली होती. पुजाराने या 35 पैकी 24 धावा चौकारांच्या मदतीने केल्या होत्या. पुजाराने 6 चौकार लगावले होते.  (Photo Credit : PTI)

Follow Us