IND vs AFG : ऋषभ पंतची ऐतिहासिक कामगिरी, असा कारनामा करणारा तिसराच भारतीय, काय केलं?

Rishabh Pant India vs Afghanistan : मुल्लानपूरमध्ये टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. ऋषभ पंत याने या सामन्यात जबरदस्त कामगिरी करुन दाखवली आहे.

| Updated on: Jun 06, 2026 | 4:36 PM
1 / 5
टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या एकट्याच्या जोरावर अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. पंतने अफगाणिस्तान विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरताच ऐतिहासिक कामगिरी केली आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5
ऋषभ पंत याने कसोटी क्रिकेटमध्ये खास अर्धशतक पूर्ण केलं आहे. ऋषभ पंत टीम इंडियासाठी 50 कसोटी सामने खेळणारा तिसरा विकेटकीपर ठरला आहे. (Photo Credit: PTI)

3 / 5
टीम इंडियासाठी विकेटकीपर म्हणून सर्वात आधी 50 कसोटी सामने खेळण्याचा विक्रम हा माजी खेळाडू सय्यद किरमानी यांच्या नावावर आहे. किरमानी यांनी भारताचं 88 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तर महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या स्थानी आहे. धोनी टीम इंडियासाठी 90 कसोटी सामने खेळला.  (Photo Credit: Getty Images)

4 / 5
ऋषभ पंत याने 2018 साली कसोटी पदार्पण केलं होतं. पंतने तेव्हापासून ते आतापर्यंत 49 कसोटी सामन्यांमध्ये 3 हजार 476 धावा केल्या आहेत. तसेच पंतने विकेटकीपर म्हणून 160 झेल घेतल्या आहेत. तसेच 16 फलंदाजांना स्टंपिंग केलं आहे. (Photo Credit: Getty Images)

5 / 5
तसेच ऋषभ पंत सय्यद किरमानी यांच्या पुढे आहे. किरमानी यांच्या नावावर 2 हजार 759 धावा आहेत. तर पंतने 176 फलंदाजांना (कॅच आणि स्टंपिंग) आऊट केलं आहे. धोनीने 294 तर किरमानी यांनी 198 जणांना स्टंपमागून आऊट केलं आहे. (Photo Credit: PTI)

Follow Us