IND vs AFG : शुबमनचं शतक, मानवचा धमाका, एकमेव कसोटी सामन्यात रेकॉर्ड्सचा पंच, काय काय झालं?

India vs Afghanistan Only Test : भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानवर एकमेव कसोटी सामन्यातील तिसऱ्याच दिवशी डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी केलेल्या काही विक्रमांबाबत जाणून घेऊयात.

| Updated on: Jun 09, 2026 | 5:05 PM
1 / 5
टीम इंडियाने अफगाणिस्तानला एकमेव कसोटी सामन्यात डाव आणि 300 धावांनी पराभूत केलं. भारताने यासह कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवला. भारताने याआधी 2018 साली वेस्ट इंडिजवर डाव आणि 272 धावांनी मात केली होती. (Photo Credit : Bcci)

2 / 5
कर्णधार शुबमन गिल याने अफगाणिस्तान विरुद्ध शतक केलं. शुबमन यासह बॅटिंग सरासरीच्या हिशोबाने कसोटीत कर्णधार म्हणून किमान 1 हजार धावा करणारा दुसरा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. शुबमनची कर्णधार झाल्यापासून बॅटिंगची सरासरी ही 82.76 अशी राहिली आहे. (Photo Credit : Bcci)

3 / 5
डेब्युटंट मानव सुथार पहिल्याच डावात सर्वोत्तम बॉलिंग करणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. मानवने पहिल्या डावात 33 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स मिळवल्या. भारतासाठी पदार्पणात नरेंद्र हिरवाणी यांनी सरस कामगिरी केली होती. हिरवाणी यांनी 1988 साली पदार्पणात विंडीज विरुद्ध 61 धावांच्या मोबदल्यात 8 विकेट्स मिळवल्या होत्या. (Photo Credit : Bcci)

4 / 5
शुबमन गिल आणि ऋषभ पंत या दोघांनी पहिल्या डावात चौथ्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारी केली. यासह शुबमन आणि ऋषभ या दोघांनी केलेली ही कोणत्याही विकेटसाठी अफगाणिस्तान विरुद्धची सर्वात मोठी भागीदारी ठरली. (Photo Credit : Bcci)

5 / 5
अफगाणिस्तानचा फलंदाज रहमत शाह याने खास कामगिरी केली. रहमतने  1 हजार कसोटी धावा पूर्ण केल्या. रहमत 1 हजार कसोटी धावा करणारा पहिला अफगाणिस्तानी ठरला. रहमनते अवघ्या 12 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. (Photo Credit : Afghanistan Cricket Board)

Follow Us