Womens T20 World Cup 2026: हरमनप्रीत कौर वर्ल्ड रेकॉर्डसाठी सज्ज, अशी कामगिरी करणारी ठरणार पहिलीच महिला खेळाडू
Harmanpreet Kaur: वुमन्स टीम इंडियाची कर्णधार आणि अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौर हीच्या निशाण्यावर मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. हरमनप्रीतला 12 जूनपासून सुरु होणाऱ्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे.

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या मोहिमेची सुरुवात 14 जूनपासून पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याने करणार आहे. हरमनप्रीत कौर या स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. हरनप्रीतला या स्पर्धेदरम्यान एका खास वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. (Photo Credit : PTI)

हरमनप्रीत कौर हीच्या नावावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. हरमनप्रीतने न्यूझीलंडची खेळाडू सूझी बेट्सला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सूझी बेट्स हीने आगामी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं एप्रिल महिन्यात जाहीर केलंय. (Photo Credit: Getty)

हरमनप्रीतने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यातील टी 20i मालिकेत सुझी बेट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. हरमनप्रीतने आतापर्यंत 197 टी 20i, 164 एकदिवसीय आणि 7 कसोटी असे एकूण 368 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर सुझी बेट्स हीने न्यूझीलंडचं 184 वनडे आणि 187 टी 20i सामन्यांत प्रतिनिधित्व केलं आहे. (Photo Credit: PTI)

हरमनप्रीतला या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. हरमनप्रीतला हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची मोठी संधी आहे. (Photo Credit: PTI)

हरमनप्रीत कौर हीच्याकडे 200 टी 20i सामने खेळणारी पहिला महिला क्रिकेटपटू हा बहुमान मिळवण्याची संधी आहे. हरमनप्रीतने आतापर्यंत 197 टी 20i सामने खेळले आहेत. (Photo Credit: PTI)