IPL 2026 : सलग दोन पराभवानंतर गुजरात टायटन्सला मिळाली आनंदाची बातमी, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध…

आयपीएल 2026 स्पर्धेत गुजरात टायटन्सची सुरूवात काही चांगली झाली नाही. सुरूवातीच्या दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आता तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार असून गुजरातसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

| Updated on: Apr 07, 2026 | 9:16 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत गुजरात टायटन्स सुरूवात काही चांगली केली नाही. गेल्या वर्षी गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये जागा मिळवली होती. मात्र यंदा पहिल्या विजयासाठी धडपड करताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पहिल्या विजयाची अपेक्षा आहे. (Photo- Gujarat Titans Twitter)

2 / 5
आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सला पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दोन्ही लढती अतितटीच्या झाल्या पण पदरी निराशा पडली. असं असताना दुसऱ्या सामन्यात शुबमन गिल खेळला नाही. त्याची उणीव भासली. पण तिसऱ्या सामन्यापूर्वी एक दिलासादायक बातमी आहे. (Photo- Gujarat Titans Twitter)

3 / 5
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामना होणार त्या एक दिवस आधी ही दिलासादायक बातमी मिळाली आहे. शुबमन गिल या सामन्यासाठी सज्ज असल्याचं स्पष्ट केलं आहे. साई सुदर्शनने मंगळवार, 7 एप्रिल रोजी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. सुदर्शनने स्पष्ट केलं की गिल मानेच्या दुखण्यातून बरा झाला असून दिल्लीविरुद्ध खेळणार आहे.(Photo- Gujarat Titans Twitter)

4 / 5
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात गिल खेळणार असल्याने आनंदाची बातमी आहे. कारण दिल्लीविरुद्ध गिलची बॅट चांगली तळपळी आहे. त्याने 16 डावांमध्ये3 अर्धशतकं ठोकली आहेत. तसेच 486 धावा केल्या आहेत. त्यामुळे गिलचं संघात असणं खूप काही आहे. (Photo- Gujarat Titans Twitter)

5 / 5
गुजरात टायटन्सला तिसऱ्या सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल. कारण हा सामना गमावला तर संघावरील दडपण वाढेल. पुढे जाऊन प्लेऑफचं गणित आणखी किचकट होत जाईल. गुजरात टायटन्सला पहिल्या विजयाची आस आहे. (Photo- Gujarat Titans Twitter)

Follow Us