15,000 धावा… T20 क्रिकेटमध्ये जोस बटलरने रचला इतिहास, असा कारनामा करणारा जगातील एकमेव खेळाडू

इंग्लंडचा स्टार फलंदाज जोस बटलरने टी20 क्रिकेटमध्ये एक मोठा पराक्रम करून दाखवला आहे. तो या फॉर्मेटमध्ये 15,000 धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

| Updated on: Sep 18, 2026 | 3:50 PM
1 / 5
इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जोस बटलरने टी20 क्रिकेटच्या इतिहासात एक असा टप्पा गाठला आहे, जिथे आजपर्यंत जगातील कोणताही फलंदाज पोहोचू शकला नव्हता. कार्डिफमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात बटलरने टी20 फॉरमॅटमध्ये आपल्या 15,000 धावा पूर्ण केल्या. (PHOTO CREDIT- PTI)

इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जोस बटलरने टी20 क्रिकेटच्या इतिहासात एक असा टप्पा गाठला आहे, जिथे आजपर्यंत जगातील कोणताही फलंदाज पोहोचू शकला नव्हता. कार्डिफमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात बटलरने टी20 फॉरमॅटमध्ये आपल्या 15,000 धावा पूर्ण केल्या. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5

वेस्टइंडिजचा दिग्गज कायरन पोलार्डला मागे टाकत बटलर पुन्हा एकदा टी20 क्रिकेटमध्ये जगातील नंबर-1 धावसंख्या उभारणारा फलंदाज बनला आहे आणि या टप्प्यापर्यंत पोहोचणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे, कायरन पोलार्ड 14,999 धावांसह दुसऱ्या स्थानावर गेला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5

श्रीलंकेविरुद्ध 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बटलरने सहकारी सलामीवीर एन्यूरिन डोनाल्डसोबत पहिल्या विकेटसाठी 51 धावांची वेगवान भागीदारी रचली. बटलरने 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 30 धावांची खेळी केली. जशी त्याने आपली 30 वी धाव पूर्ण केली, तसा तो 15 हजार धावांच्या ऐतिहासिक शिखरावर पोहोचला. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5

जोस बटलरने 15,000 टी20 धावांचा टप्पा 528 सामन्यांच्या 497 डावांमध्ये गाठला आहे. त्याने या धावा 35.46 च्या सरासरीने आणि 147.46 च्या स्ट्राईk रेटने केल्या आहेत. या दरम्यान त्याने 9 शतके आणि 107 अर्धशतके झळकावली आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5

बटलरच्या टी20 धावांचा एक मोठा हिस्सा जगातील सर्वात लोकप्रिय लीग म्हणजेच आयपीएल मधून आला आहे. आयपीएलमध्ये तीन फ्रँचायझींसाठी खेळताना त्याने 138 सामन्यांत 39.70 च्या सरासरीने 4,646 धावा केल्या आहेत. तर, 4,322 धावा त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केली आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us