IPL 2026: अजिंक्यचा वाईट काळ, कॅप्टनच्या नावावर सर्वात खराब रेकॉर्ड, काय झालं?

Ajinkya Rahane KKR Ipl 2026 : अजिंक्य रहाणे याने त्याच्या नेतृत्वात केकेआरला पहिलावहिला विजय मिळवून दिला. मात्र अजिंक्यचा फलंदाज म्हणून धावांसाठीचा संघर्ष सुरुच आहे. अजिंक्य राजस्थान विरुद्ध झिरोवर आऊट झाला. त्यामुळे अजिंक्यच्या नावावर नको त्या विक्रमाची नोंद झाली आहे.

| Updated on: Apr 20, 2026 | 4:56 PM
1 / 5
केकेआरने 19 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आपल्या मोहिमेतील सातव्या सामन्यात विजयाचं खातं उघडलं. त्यामुळे कोलकाताच्या चाहत्यांना दिलासा मिळाला. मात्र कर्णधार अजिंक्य रहाणे सातत्याने धावा करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे अजिंक्यच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5
केकेआरने राजस्थानला पराभूत करत विजयाचं खातं उघडलं. अजिंक्य या सामन्यात बॅटिंगने योगदान देण्यात अपयशी ठरला. अजिंक्य राजस्थानसमोर 2 चेंडू खेळून झिरोवर आऊट झाला. (Photo Credit: PTI)

3 / 5
अजिंक्य यासह गौतम गंभीर याच्यानंतर (2014) सलग 2 वेळा झिरोवर आऊट होणारा केकेआरचा दुसरा कर्णधार ठरला.  अजिंक्य राजस्थानआधी गुजरात विरूद्धच्या सामन्यात पहिल्याच बॉलवर आऊट झाला होता. (Photo Credit: PTI)

4 / 5
अजिंक्य आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक झिरोवर आऊट होणारा ओपनर फलंदाज ठरला आहे. अजिंक्यने पार्थिव पटेल याचा 11 वेळा झिरोवर आऊट होण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला.  (Photo Credit: PTI)

5 / 5
राजस्थान विरूद्धच्या सामन्यात अजिंक्य व्यतिरिक्त त्याचा ओपनर पार्टनर टीम सायफर्ट हा देखील भोपळा  न फोडताच माघारी गेला. अशाप्रकारे  2014 नंतर केकेआरचे दोन्ही ओपनर झिरोवर आऊट होण्याची ही पहिलीच  वेळ ठरली. (Photo Credit: PTI)

Follow Us