सचिन-विराट आणि रोहितला जे जमलं नाही ते लॉर्ड्सवर क्रांती गौडने करून दाखवलं, 2021 नंतर असं घडलं
भारतीय महिला संघाने लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडचा 270 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात भारताचा वरचष्मा राहिला. पहिल्या डावात क्रांती गौडच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला आणि भारताने सामन्यावर पकड मिळवली.

लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात भारताची पकड पहिल्या डावापासून मजबूत होती. हा सामना भारताने 270 धावांनी जिंकला. लॉर्ड्स या ऐतिहासिक मैदानात पहिला महिला कसोटी सामना होता. यात भारताने विजय मिळवला. (फोटो-GETTY IMAGES)

भारताच्या विजयाच्या मुख्य सूत्रधार ही वेगवान गोलंदाज क्रांती गौड ठरली. कारण तिने पहिल्या डावात इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. तिने पहिल्यात फक्त 37 धावा देत 5 विकेट काढल्या. तर दुसऱ्या डावात दोन विकेट घेण्यात यशस्वी ठरली. (फोटो-GETTY IMAGES)

कसोटी सामन्यातील उल्लेखनीय कामगिरीसाठी क्रांती गौडला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारने गौरविण्यात आलं. लॉर्ड्स महिला कसोटी सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली. तसेच पाचवी भारतीय ठरली. (फोटो-GETTY IMAGES)

क्रांती गौड याच्या आधी 1979 मध्ये दिलीप वेंगसरकर, 1982 आणि 1986 मध्ये कपिल देव, 2014 मध्ये इशांत शर्मा आणि 2021 मध्ये केएल राहुलने लॉर्ड्स कसोटीत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. आता क्रांती गौडने हा मान मिळवला आहे. (फोटो-GETTY IMAGES)

लॉर्ड्स कसोटी सामन्यात 11 वर्षानंतर गोलंदाजाने प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला आहे. इशांत शर्मानंतर हा मान क्रांती गौडने मिळवला आहे. क्रांतीच्या करिअरमधील दुसरा कसोटी सामना होता. यातच तिने हे देदिप्यमान यश मिळवलं आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर यांना हे यश मिळालेलं नाही. (फोटो-GETTY IMAGES)