
आयपीएल 2026 स्पर्धेतून मुस्तफिझुर रहमान याला वगळल्यानंतर रणकंदन माजलं होतं. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने हा अपमान असल्याचं भारतात टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यास नकार दिला. इतकंच काय स्पर्धेत भाग घेतला नाही. त्यामुळे मुस्तफिझुर रहमानसाठी किती मोठा वाद झाला हे सांगायला नको. असं असताना मुस्तफिझुर रहमान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Photo- PTI)

बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान यांची द हंड्रेड लिलावासाठी निवड झाली आहे. द हंड्रेड स्पर्धेत आयपीएल संघाचे मालक देखली आहेत. एमआय लंडन, मॅन्चेस्टर सुपर जायंट्स, सनरायझर्स लीड्स आणि सदर्न ब्रेव या संघांना आयपीएल मालकांनी विकत घेतलं आहे. (Photo- PTI)

द हंड्रेड लिलावासाठी मुस्तफिझुर रहमान याने आपली सुरूवाती रक्कम 1 लाख पाउंड निश्चित केली आहे. तर रिशादची बेस प्राइस ही 75 हजार पाउंड आहे. आयपीएलमध्ये संघ असलेले मालक मुस्तफिझुर रहमानवर बोली लावण्याची शक्यता आहे. (Photo- PTI)

द हंड्रेड स्पर्धेत पहिल्यांदाच लिलाव होणार आहे. यासाठी 11 आणि 12 मार्च ही तारीख ठरवली गेली आहे. ही लिलाव प्रक्रिया लंडनमध्ये पार पडणार आहे. या लिलावासाठी 23 बांगलादेशी खेळाडूंनी नाव नोंदवलं होतं. त्यापैकी रिशाद हुसैन आणि मुस्तफिझुर रहमान यांची निवड झाली आहे. (Photo- PTI)

द हंड्रेड लिलावात 16 संघातील पुरूष आणि महिलासहीत 200हून अधिक खेळाडू भाग घेतील. ही स्पर्धा 21 जुलैपासून सुरू होणार आहे. यात पहिला सामना एमआय लंडन आणि सनरायझर्स लीड्स यांच्यात होईल. तर अंतिम सामना 16 ऑगस्टला होणार आहे. (Photo- PTI)