टीम इंडियात निवड झाल्याने चर्चा झाली तिनेच कमाल केली, टी20 वर्ल्डकपपूर्वी कहर

Nandini Sharma: नंदिनी शर्मा हे भारतीय वरिष्ठ महिला संघातील नवं नाव... टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी तिची संघात निवड झाली होती. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण या स्पर्धेपूर्वी झालेल्या टी20 डेब्यू सामन्यात तिने आपली क्षमता दाखवून दिली.

| Updated on: May 29, 2026 | 3:44 PM
1 / 5
भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला पहिल्या टी20 सामन्यात पराभवाची धूळ चारली. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी भारताने आपली तयारी काय आहे ते दाखवून दिलं. भारताने हा सामना 38 धावांनी जिंकला. या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या नंदिनी शर्माने विजयात मोलाचं सहकार्य केलं. 24 वर्षीय खेळाडूने या सामन्यात भेदक गोलंदाजी केली. ( Photo: Twitter/BCCI Women)

2 / 5
नंदिनी शर्माने इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या पहिल्या टी20 सामन्यात 4 षटकात 34 धावा देऊन 3 गडी बाद केले. या दौऱ्यापूर्वी नंदिनीची निवड टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी झाली होती. पण तिने आपली क्षमता काय आहे ते दाखवून दिलं आहे. ( Photo: Twitter/BCCI Women)

3 / 5
नंदिनी शर्माला अनुभव नसताना निवड झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळता तिची निवड झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं. पण तिने निवड योग्य असल्याचं पहिल्याच सामन्यात दाखवून दिलं.  ( Photo: Twitter/BCCI Women)

4 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा इंग्लंडमध्ये होत आहे. या स्पर्धेपूर्वी इंग्लंडला तिने त्यांच्याच भूमीत दणका दिला आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत तिच्या गोलंदाजीची चमक दिसेल, हे पहिल्याच सामन्यात दाखवून दिलं आहे. ( Photo: Twitter/BCCI Women)

5 / 5
नंदिनी शर्माने वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत आपली छाप सोडली होती. ती दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होती. तिने एकाच सामन्यात हॅटट्रीक आणि 5 विकेट घेऊन इतिहास रचला होता. नंदिनी महिला टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पणात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारी दुसरी गोलंदाज ठरली आहे. या यादीत सोनिया दबीर अव्वल स्थानी असून 2010 मध्ये इंग्लंडविरुद्ध 23 धावांत तीन बळी घेतले होते.( Photo: Twitter/BCCI Women)

Follow Us