कॉमनवेल्थमधील पराभवाचा वचपा काढण्याची नीरज चोप्राला संधी, या दिवशी श्रीलंकेच्या पाथिरागेशी भिडणार
कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने सुवर्ण पदक पटकावलं. तर भारताच्या नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. असं असताना आता हिशेब चुकता करण्याची संधी नीरज चोप्राकडे आहे. चला जाणून या दोघांचा सामना कधी होणार ते...

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि श्रीलंकेचा रुमेश पाथिरागे यांच्यात पुन्हा एकदा लढत पाहायला मिळणार आहे. पण हा सामना कधी होणार? याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे. कारण कॉमनवेल्थ स्पर्धा नुकतीच संपली असून रुमेशने नीरजला मात देत सुवर्ण पदक पटकावलं आहे. (Photo: PTI)

आशिया खंडातील दोन्ही दिग्गज भालाफेकपटू यांची भिडत आता लौसाने डायमंड लीग स्पर्धेत होणार आहे. या स्पर्धेत नीरज चोफ्रा कॉमनवेल्थ स्पर्धेतील पराभवचा वचपा काढण्यासाठी सज्ज असेल. (Photo: PTI)

लौसाने डायमंड लीग स्पर्धा 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा स्वित्झर्लंडमधेय होणार असून नीरज चोप्रासमोर रुमेश पाथिरागेचं आव्हान असणार आहे. या शिवाय इतर भालाफेकपटूही असणार आहेत. (Photo: PTI)

लौसाने डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्रा आणि रुमेश पाथिरागे यांच्या शिवाय अर्शद नदीम, अँडरसन पीटर्स, केसॉर्न वालकोट यासारखे दिग्गज भालाफेकपटू असणार आहेत. या सर्वांचा सामना नीरजने कॉमनवेल्थमध्ये केला होता. (Photo: PTI)

नीरज चोप्राने कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं. तर श्रीलंकेच्या रुमेश पाथिराने गोल्डन पदक मिळवलं होतं. तर भारताच्या यशवीरने कांस्य पदकावर नाव कोरलं होतं. (Photo: PTI)