
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धची टी20 मालिका 3-0 ने गमावली आहे. व्हाईटवॉशसह पाकिस्तानने 2024 या वर्षात नकोसा विक्रम रचला आहे. 2024 या वर्षात सर्वाधिक सामने गमवणाऱ्या संघाच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

पाकिस्ताने या वर्षात एकूण 22 टी20 सामने खेळला आणि त्यापैकी फक्त 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामने रद्द करण्यात यश मिळवलं. या व्यतिरिक्त 13 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पाकिस्तान या वर्षात सर्वाधिक सामने गमवणारा पूर्ण सदस्यीय संघ ठरला आहे.

नेतृत्व बदलामुळे पाकिस्तानची अनेक मालिकांमध्ये कामगिरी निराशाजनक राहिली आहे. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात पाकिस्तानला व्हाईटवॉशचा सामना करावा लागला. एका वर्षात इतक्या वाईट पद्धतीने पराभूत होणारा पहिला पूर्ण सदस्यीय संघ ठरला आहे.

दरम्यान, इंडोनेशियाने या वर्षात सर्वाधिक टी20 सामने गमावले आहेत. इंडोनेशियाने 36 पैकी 15 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. आता पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात टी20 मालिका होणार आहे. यात दोन पराभव झाले तर पाकिस्तानला तोंड दाखवायला जागा उरणार नाही.

भारतीय संघाने या वर्षात एकूण 26 सामने खेळला आहे. भारतीय संघ फक्त झिम्बाब्वे आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी एक सामना हरला आहे. तसेच 24 सामन्यात विजय मिळवला आहे. इतकंच काय तर या वर्षात टी20 वर्ल्डकपही जिंकला आहे.