
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानने विजयाने सुरुवात केली आहेत. साखळी फेरीत नेदरलँड आणि अमेरिकाला पराभूत केलं होतं. पण तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवलं. पण तिसरा सामना सुपर 8 फेरीत पाकिस्तानने जागा मिळवली. (Photo- ICC Twitter)

सुपर 8 फेरीत पाकिस्तानचा न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना रद्द झाला. त्यामुळे उपांत्य फेरीचं गणित चुकलं. पाकिस्तानला इंग्लंडकडून पराभवाची धूळ चाखावी लागली. त्यामुले पाकिस्तानचं गणित शेवटच्या सामन्यात विजयासोबत नेट रनरेटवर आलं होतं. पाकिस्तानने हा सामना जिंकला पण नेट रनरेट काही सुधारू शकला नाही. (Photo- ICC Twitter)

पाकिस्तानचं टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असलं तरी आयसीसीकडून बक्षिसी रक्कम मिळणार आहे. आयसीसीच्या प्राइस मनी पॉलिसी अंतर्गत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना बक्षिसी रक्कम दिली जाते. पाकिस्तान संघालाही कोट्यवधींचं बक्षीस मिळणार आहे. (Photo- ICC Twitter)

आयसीसीने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत 11.25 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं होतं. यंदाही तितकीच रक्कम अपेक्षित आहे. आयसीसीकडून 3.5 कोटी रक्कम मिळण्याचा अंदाज आहे. ही रक्कम स्पर्धेत पोहोचण्यासाठी आणि सुपर 8 टप्प्यात खेळण्यासाठी संघाला दिली जाईल. (Photo- ICC Twitter)

आयसीसी साखळी फेरी आणि सुपर 8 सामन्यांमध्ये जिंकणाऱ्यांना वेगवेगळे बक्षिसे देते. जिंकलेल्या प्रत्येक सामन्यासाठी एका संघाला अंदाजे 28 लाख मिळतात. पाकिस्तानने गट फेरीत तीन आणि सुपर 8 मध्ये एक सामना जिंकला. चार विजयांसाठी, संघाला अंदाजे 1.12 कोटी मिळतील. (Photo- ICC Twitter)