आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्सच्या नावावर ऐतिहासिक नोंद, पहिल्यांदाच केली अशी कामगिरी
आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्सची विजयी घोडदौड सुरू आहे. या स्पर्धेत पंजाब किंग्सने सलग विजयाची मालिका सुरू ठेवली आहे. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं. तर कोलकात्याविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला.

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सने जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी केली आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्सने 11 गुण मिळवून स्पर्धेत इतिहासाची नोंद केली आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही संघाला करता आली नाही. (Photo: Punjab Kings Twitter)

आयपीएल स्पर्धेतील 29वा सामना पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करतना पंजाब किंग्सने 20 षटकात 254 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना लखनौचा संघ 200 धावांपर्यंत पोहोचू शकला. हा सामना पंजाब किंग्सने 54 धावांनी जिंकला. (Photo: Punjab Kings Twitter)

पंजाब किंग्सने या विजयासह आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच पहिले सहा जिंकण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही संघाला करता आली नाही. आयपीएल स्पर्धेत कोणत्याही संघाने पहिले सहा सामने न हरता गुण मिळवलेले नाहीत. (Photo: Punjab Kings Twitter)

पंजाब किंग्सने सहा सामन्यापैकी पाच सामन्यात मोठा विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यातून एक गुण मिळाला आहे. पहिल्या सहा सामन्यात 11 गुण मिळवणारा पंजाब किंग्स हा पहिला संघ ठरला. (Photo: Punjab Kings Twitter)

यापूर्वी हा दुर्मिळ विक्रम राजस्थान रॉयल्सच्या नावावर होता. राजस्थान रॉयल्सने 2015 मध्ये पहिले पाच सामने जिंकून 10 मिळवले होते. आता हा विक्रम पंजाब किंग्सने मोडला असून सहा सामन्यात 11 गुण मिळवले आहेत. (Photo: Punjab Kings Twitter)