Shubman Gill-Sai Sudharsan: शुबमन गिल-साई सुदर्शनने ठोकलं 11वं शतक, विराट-ख्रिसचा विक्रम मोडला
आयपीएल 2026 क्वॉलिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्सच्या शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांचा झंझावात पाहायला मिळाला. या दोघांनी मिळून एक ऐतिहासिक कामगिरी केली. दोघांनी आयपीएलच नाही तर टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणारे फलंदाज ठरले आहेत.

आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वॉलिफायर 2 सामन्यात शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांची बॅट चांगलीच तळपली. ही जोडी फोडण्यासाठी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना खूपच घाम गाळावा लागला. पण तिथपर्यंत शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीने इतिहास रचला होता. (Photo: PTI)

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध शतकी भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी 11व्यांदा शतकी भागीदारी केली. या भागीदारीसह विश्वविक्रम रचला. यापूर्वी ख्रिस गेल आणि विराट कोहलीच्या नावावर हा विक्रम होता. त्यानी 63 डावात 10 वेळा शतकी भागीदारी केली होती. पण शुबमन गिल आणि साई सुदर्शनने 48 डावात ही कामगिरी केली. (Photo: PTI)

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी 167 धावांची भागीदारी रचली. आयपीएल प्लेऑफमधील सर्वोच्च भागीदारी आहे. या सामन्यात सुदर्शनने 32 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या. या शुबमन गिलने 45 चेंडूत 95, तर साई सुदर्शनने 32 चेंडूत 58 धावा केल्या. (Photo: PTI)

शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनीही गुजरात टायटन्सविरुद्ध सामना जिंकून देणारी खेळी केली. या दोन्ही खेळाडूंनी आयपीएल 2026 मध्ये 700 हून अधिक धावा केल्या. शुभमन गिलने तर एक शानदार शतकही झळकावले. त्याने 53 चेंडूत 15 चौकार आणि 3 षटकार मारत 104 धावा केल्या. (Photo: PTI)

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत या जोडी गुजरात टायटन्स संघासाठी 886 धावांची भागीदारी केली आहे. आयपीएल स्पर्धेतील हा चौथा सर्वोच्च रेकॉर्ड आहे. या जोडीने 2025 मध्ये 912 धावांची भागीदारी केली. शुबमन गिल आणि साई सुदर्शन जोडीने आयपीएल इतिहासात 2944 धावांची भागीदारी केली आहे. त्यांच्या पुढे आता विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स जोडी आहे. या जोडीने 3123 धावा केल्या होत्या. (Photo: PTI)