Shubman Gill कडून रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी मोठा झटका, नक्की काय केलं?
Shubman Gill Break Rohit Sharma Record : शुबमन गिल याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात अरुण जेटली स्टेडियममध्ये कारकीर्दीतील 10 वं शतक झळकावलं. शुबमनने यासह हिटमॅनचा रेकॉर्ड ब्रेक केला.

टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 19 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्याआधी नवनियुक्त कॅप्टन शुबमन गिल याने विंडीज विरुद्ध कसोटी मालिकेत धमाका केला आहे. (Photo Credit : Bcci X Account)

शुबमन गिल याने टीम इंडियाचा माजी कसोटी फलंदाज रोहित शर्मा याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. शुबमन यासह भारतासाठी अशी कामगिरी करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला आहे. (Photo Credit : Bcci X Account)

शुबमनने वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी शतक झळकावलं. शुबमनने 177 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. शुबमनने यासह रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला. (Photo Credit : Bcci X Account)

शुबमनचं कसोटी कारकीर्दीतील आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासातील दहावं शतक ठरलं. शुबमनने यासह रोहितच्या 9 शतकांचा विक्रम मोडीत काढला. शुबमन यासह भारतासाठी डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 10 शतकं करणारा पहिल फलंदाज ठरला. (Photo Credit : Getty Images)

शुबमनचं कसोटी कर्णधार म्हणून पाचवं शतक ठरलं. शुबमनने विंडीज विरुद्ध नाबाद खेळी केली. शुबमनने 2 सिक्स आणि 16 फोरसह 196 चेंडूत 129 धावा केल्या. (Photo Credit : Bcci X Account)