
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रिंकु सिंह आणि सपा खासदार प्रिया सरोज यांचा रविवारी 8 जून रोजी लखनौमधील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये शाही साखरपुडा समारंभ पार पडला. त्यांनतर सोशल मीडियावर रिंकु सिंह आणि प्रिया सरोज या दोघांपैकी श्रीमंत कोण? अशी चर्चा रंगली आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊयात. (Photo Credit : @PriyaSarojMP X Account)

प्रिया सरोज ही उत्तरप्रदेशमधील मछलीशहर या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते. प्रियाचे वडील तूफानी सरोज हे 3 वेळा खासदार राहिलेत. त्यामुळे प्रियाला घरातूनच राजकारणाचे धडे मिळाले. प्रियाने कायद्याची पदवी घेतली आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

निवडणूक लढवण्याआधी प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्राद्वारे त्याच्याकडे असलेली संपत्ती जाहीर करावी लागते. या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, प्रिया सरोजाकडे एकूण 11 लाख रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये सोनं, जमीन आणि रोख रक्कमेचा समावेश आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

रिंकू सिंह टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करतो. रिंकूला बीसीसीआयकडून वार्षिक करारानुसार 1 कोटी रुपये मिळतात. रिंकू टीम इंडियाचं वनडे आणि टी 20i क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करतोय. बीसीसीआयकडून प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15, वनडेसाठी 9 तर टी 20i सामन्यासाठी 3 लाख रुपये दिले जातात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

तसेच रिंकू आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करतो. रिंकूला केकेआरने आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी 13 कोटी रुपयात रिटेन केलं होतं. तसेच 2024 पासून आयपीएलमधील प्रत्येक सामन्यासाठी खेळाडूला 7 लाख 50 हजार रुपये मिळतात. तसेच रिंकू जाहीरातींच्या माध्यमातूनही कमाई करतो. मीडिया रिपोर्ट्नुसार, रिंकूचं नेटवर्थ हे 8-9 कोटी इतकं आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)