अजित आगरकरचा निर्णय अखेर झाला, निवड समिती अध्यक्षपदाबाबत बीसीसीआयने असा फिरवला गेम
मुंबईत बीसीसीआयच्या हेडक्वार्टरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीकडे क्रीडाविश्वाचं लक्ष लागून होतं. कारण या बैठकीत अजित आगरकर, रोहित शर्मा आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या भविष्याचा निर्णय घेणार होते. या बैठकीत अजित आगरकर काही वैयक्तिक कारणाने उपस्थित नव्हता. त्यामुळे त्याचं काय होणार असा प्रश्न होता.

टीम इंडिया निवड समितीच्या अध्यक्षपदी अजित आगरकर राहणार की जाणार? याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. पण अजित आगरकर यांच्या पदाला कोणताही धक्का बसलेला नाही. निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम असणार आहे. मुंबईत बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. (फोटो: पीटीआय)
बीसीसीआयच्या बैठकीपूर्वी अजित आगरकर यांना पदावरून दूर सारलं जाणार अशा बातम्या आल्या होत्या. इतकंच काय तर व्हीव्हीएस लक्ष्मणकडे मोठी भूमिका सोपवली जाणार असंही बोललं जात होतं. पण या दोन्ही बातम्या खोट्या निघाल्या. (फोटो: पीटीआय)
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, व्हीव्हीएस लक्ष्मणला क्रिकेट डायरेक्टर असं कोणतंच पद दिलं जाणार नाही. सेंटर ऑफ एक्सिलेंसच्या अध्यक्षपदी कायम असणार आहे. (फोटो: पीटीआय)
बीसीसीआयने सेक्रेटरी देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, अजित आगरकर निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम राहिल. निवड समितीत कोणताही बदल केला जाणार नाही. वनडे वर्ल्डकप 2027पर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. (फोटो: पीटीआय)
बीसीसीआयने रोहित शर्माच्या भवितव्याबाबतही निर्णय दिला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी रोहित शर्माच्या बॅटिंगची स्तुती केली. त्यामुळे रोहित शर्मा वनडेतून निवृत्त होणार नाही हे कन्फर्म झालं. इतकंच काय तर वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या शर्यतीत राहील. (फोटो: पीटीआय)