आयपीएलमधील 3 खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत बंदी, झालं असं की…

आयपीएल 2026 स्पर्धेत संधी नाकारलेल्या अनेक खेळाडूंसाठी पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेची दारं खुली झाली आहे. पण काही खेळाडूंना पीएसएलमधून काढता पाय घेतला. त्यामुळे संतापलेल्या पाकिस्तान सुपर लीग व्यवस्थापकांनी तीन खेळाडूंवर बंदी घातली आहे.

| Updated on: Apr 21, 2026 | 4:44 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धा मोठ्या दिमाखात सुरू आहे. नव्या दमाचे खेळाडू स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहेत. तर मागच्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळलेल्या डेवॉन कॉनवे, सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार डेविड वॉर्नर आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाजी स्टीव्ह स्मिथ आणि एरॉन हार्डी हे पीएसएलमधून खेळत आहेत. असं असताना काही खेळाडूंनी पीएसएलला रामराम ठोकत आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घातली गेली आहे.

2 / 5

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत निवड होऊनही त्यांनी आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तीन खेळाडूंवर बंदी घातली आहे.

3 / 5

झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझरबानी याची पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत निवड झाली होती. पण स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याने पीएसएलमधील इस्लामाबाद युनायटेडसोबतचा करार मोडला आणि केकेर संघातसहभागी झाला. त्यामुळे त्याच्यावर पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

4 / 5

दासुन शनाका हा श्रीलंकेचा आक्रमक फलंदाज असून पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत लाहोर कलंदर्सकडून मैदानात उतरणार होता. पण आयपीएल स्पर्धेतून त्याला ऑफर मिळाली आणि त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर पीएसएलमध्ये एका वर्षाची बंदी घातली गेली आहे.

5 / 5

दक्षिण अफ्रिकेचा कॉर्बिन बॉश हा याची मागच्या वर्षी पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत निवड झाली होती. पेशावर झल्मी संघातून खेळणार होता. पण मुंबई इंडियन्सकडून बदली खेळाडू म्हणून विचारणा झाली आणि त्याने होकार देत पीएसएलला रामराम ठोकला. कॉर्बिन बॉशवर एका वर्षाची बंदी घातली आहे. (सर्व फोटो: टीव्ही 9 कन्नडवरून)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us