Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी नंबर 1 होणार की नाही? 19 एप्रिलला लागणार निकाल
वैभव सूर्यवंशीकडे नंबर 1 भारतीय होण्याची मोठी संधी आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात 19 एप्रिलला सामना होणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशी चांगलाच फॉर्मात आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत नाव असून त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. असं असताना वैभव सूर्यवंशीसाठी 19 एप्रिलचा दिवस खास असणार आहे. त्याच्याकडे नंबर 1 भारतीय होण्याची संधी आहे. (Photo: IPL/BCCI)

वैभव सूर्यवंशीकडे टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 100 धावा करण्याचा विक्रम रचण्याची संधी आहे. वैभव सूर्यवंशीची जागतिक पातळीवर नंबर 1 होण्याची संधी हुकली. मात्र नंबर 1 भारतीय होण्याची संधी आहे. (Photo: IPL/BCCI)

19 एप्रिलला राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीला ही संधी असणार आहे. वैभव सूर्यवंशी ने 23 डावात 901 धावा केल्या आहेत. 24 व्या सामन्यात 99 धावांची खेळी करताच टी20 क्रिकेटमध्ये वेगाने 1000 धावा करणारा भारतीय खेळाडू ठरेल. (Photo: IPL/BCCI)

देवदत्त पडिक्कलने 25 डावात टी20 क्रिकेटमध्ये 1000 धावा केल्या आहे. आता हा विक्रम मोडण्याची संधी वैभवकडे आहे. मागच्या सामन्यात खरं तर ही संधी होती. पण त्याला खातंही खोलता आलं नाही. आता हा विक्रम मोडण्याची किंवा बरोबरी करण्याची संधी आहे. (Photo: IPL/BCCI)

ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही वैभव सूर्यवंशी टॉप 5 मध्ये आहे. विराट कोहली या यादीत पहिल्या स्थावर आहे. विराट कोहलीने 228 धावा, हेनरिक क्लासेनने 224 धावा, रजत पाटीदारने 222 धावा, इशान किशनने 213 धावा आणि वैभव सूर्यवंशीने 200 धावा केल्या आहेत. (Photo: IPL/BCCI)