वैभव सूर्यवंशीची आयपीएल स्पर्धेत मोठी कामगिरी! आतापर्यंत जगभरातील टी20 लीगमध्ये असं घडलं नाही

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने जगभरातील टी20 लीग स्पर्धेत एक मैलाचा दगड गाठला आहे. आतापर्यंत त्याच्यासारखी कामगिरी कोणत्याही फलंदाजाने केलेली नाही. वैभव सूर्यवंशीने जबरदस्त स्ट्राईक रेटसह 400पेक्षा अधिक धावा करत नवा विश्वविक्रम रचला आहे.

| Updated on: Jun 01, 2026 | 5:13 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा प्रवास क्वॉलिफायर 2 मध्ये थांबला. असं असलं तरी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत वैभव सूर्यवंशी चर्चेत राहिला. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने यंदाचं पर्व गाजवलं. त्याची फलंदाजी पाहून अनेक जण त्याचे चाहते झाले आहेत. इतकंच काय तर जगभरातील टी20 लीगमध्ये त्याच्यासारखी कामगिरी कोणी केलेली नाही. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 स्पर्धेत 237पेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने 776 धावा केल्या.  इतक्या जबरदस्त स्ट्राईक रेटने जगभरातील टी20 लीगमध्ये एकाही फलंदाजाने 400 किंवा त्याहून अधिक धावा केलेल्या नाही. त्यामुळे वैभव सूर्यवंशीच्या नावे एक विक्रम रचला गेला आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
वैभव सूर्यवंशीच्या आधी न्यूरीन डोनाल्डच्या नावावर हा विक्रम होता. त्याने टी20 ब्लास्ट 2025 मध्ये डर्बीशरकडून खेळताना 216.90 च्या स्ट्राईक रेटने 449 धावा केल्या होत्या. हेनरिक क्लासेनने डरबन सुपर जायंट्सकडून एसए20 2024 मध्ये 207.90 च्या स्ट्राईक रेटने 447 दावा केल्या होत्या.  (Photo: IPL/BCCI)

4 / 5
वैभव सूर्यवंशीला आयपीएल 2026 स्पर्धेत ऑरेंज कॅप मिळाली. वैभव सूर्यवंशीला  ' सीझनचा उदयोन्मुख खेळाडू', 'सीझनचा सुपर स्ट्रायकर' (237.3), 'सीझनचा सुपर सिक्सर' (72) हे पुरस्कार मिळाले. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
वैभव सूर्यवंशी आपलं मत मांडताना म्हणाला की, खूप छान वाटते, पण मी इथे मुलाखतीसाठी आलो असल्यामुळे थोडा दबाव जाणवतोय. पण हो, हा एक अभिमानाचा क्षण आहे, खूप छान वाटतेय आणि पुढच्या हंगामात मी आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. (Photo: IPL/BCCI)

Follow Us