IPL 2026: विराट कोहली चौथ्यांदा विक्रम रचण्याच्या वेशीवर, हैदराबादविरुद्ध असं केलं की झालं
आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. आरसीबीचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. हा सामना टॉप 2 मधील स्थान पक्कं करण्यासाठी महत्त्वाचा आहे. असं असताना विराट कोहली आणखी एक विक्रम रचण्याच्या वेशीवर आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्लेऑफमधील स्थान पक्कं केलं आहे. पण या स्पर्धेतील शेवटचा साखळी फेरीचा सामना खेळणं उरलं आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना जिंकला तर गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राहिल आणि क्वालिफायर 1 खेळतील. या सामनयात विराट कोहली एक विक्रम रचू शकतो. (Photo: IPL/BCCI)

आरसीबी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होमार आहे. या सामन्यात विराटकोहली एक विक्रम रचण्यापासून 58 धावा दूर आहे. त्याने या सा सामन्यात 58 धावा केल्या तर त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला जाईल. (Photo: IPL/BCCI)

विराट कोहलीने 58 धावा करताच या पर्वात 600 धावांचा पल्ला गाठेल. तसं झालं तर सलग चार पर्वात 600 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम रचेल. विराट कोहलीने 2023 मध्ये 639, 2024 मद्ये 741 आणि 2025 मद्ये 657 धावा केल्या आहेत. (Photo: IPL/BCCI)

विराट कोहलीने या पर्वातील 13 सामन्यात 54.20 च्या सरासरीने 164.74 च्या स्ट्राईक रेटने 542 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने 58 धावा केल्या तर सलग चार पर्वात 600हून अधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. (Photo: IPL/BCCI)

विराट कोहली, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर आणि केएल राहुल यांनी सलग तीन पर्वात 600 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. मात्र कोणत्याही फलंदाजाने अशी कामगिरी चार वेळा केलेली नाही. आता विराट कोहली हा विक्रम रचू शकतो. (Photo: IPL/BCCI)