‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ताने गुपचूक उरकला साखरपुडा? दाजी आहेत तरी कोण?

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

| Updated on: Aug 01, 2025 | 12:00 PM
1 / 5
'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली. प्रचंड लोकप्रियता मिळवलेली प्राजक्ता सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
या फोटोंमध्ये प्राजक्त नवरीसारखी नटलेली दिसून येत आहे. तिच्या गळ्यात पुष्पहार आहे आणि एखाद्या वधूप्रमाणेच तिने साजश्रृंगार केला आहे. हे फोटो पाहून प्राजक्ताच्या चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे.

3 / 5
या फोटोंवरून प्राजक्ताने गुपचूप साखरपुडा उरकला की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा, असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

4 / 5
प्राजक्ताने 'ठरलं' असा हॅशटॅगसुद्धा या फोटोंना जोडला आहे. त्यामुळे तिचं लग्न खरंच ठरलंय, अशी चर्चा सुरू आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता वालावलकर, गायिका सावनी रविंद्र, अभिनेत्री ऋतुजा बागवे, गायिका कार्तिकी गायकवाड यांनीसुद्धा तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5
याआधीही प्राजक्ताने बघण्याच्या कार्यक्रमाचे काही फोटो पोस्ट केले होते. 'पाहुणे मंडळी' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं होतं. त्यासोबत तिने लिहिलेलं, 'इंजीनिअरिंग झाल्यावर जॉब कधी लागणार? वयात आल्यावर लग्न कधी करणार? हे प्रश्न ठरलेले असतात.'