TMKOC : बबितापेक्षा जेठालालला मिळतं 204% अधिक मानधन; जाणून घ्या इतरांचीही फी..

येत्या 28 जुलै रोजी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेला तब्बल 18 वर्षे पूर्ण होणार आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतील ही सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दिलीप जोशी यांच्यापासून मुनमुन दत्तापर्यंत.. प्रत्येक कलाकार सोशल मीडियावर चर्चेत असतो. यातील कलाकारांना किती मानधन मिळतं, ते जाणून घ्या..

| Updated on: Jul 19, 2026 | 12:33 PM
1 / 5
'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, यामध्ये बबिताजींची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताला 50 हजार ते 75 हजार रुपयांपर्यंत मानधन मिळतं. तर जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांची फी मुनमुनपेक्षा तब्बल 200 टक्क्यांनी अधिक आहे.

2 / 5
दिलीप जोशी या मालिकेतील सर्वांत लोकप्रिय कलाकार आहेत. जेठालाल या भूमिकेसाठी त्यांना प्रति एपिसोड 1.5 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत मानधन मिळतं. गेल्या अठरा वर्षांपासून ते या मालिकेत ही भूमिका साकारत असून सर्वाधिक फी त्यांचीच आहे.

3 / 5
यामध्ये पत्रकार पोपटलालची भूमिका अभिनेता श्याम पाठक साकारतोय. मालिकेतील इतर काही कलाकार गेल्या काही वर्षांत बदलले, मात्र श्यामसुद्धा सुरुवातीपासूनच यात काम करतोय. या भूमिकेसाठी त्याला प्रति एपिसोड 60 हजार रुपये मानधन मिळतं.

4 / 5
'तारक मेहता..' या मालिकेत अमित भट्ट हे जेठालालचे वडील चंपकलाल गढाच्या भूमिकेत आहेत. खऱ्या आयुष्यात अमित भट्ट हे दिलीप जोशी यांच्यापेक्षाही वयाने लहान आहेत. तरी त्यांनी वडिलांची भूमिका चोख साकारली आहे. एका एपिसोडसाठी त्यांना 70 हजार रुपये मानधन मिळतं.

5 / 5
या मालिकेत अभिनेते मंदार चांदवडकर हे शिक्षक आणि गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडेच्या भूमिकेत आहेत. तर अभिनेत्री सोनालिका ही त्यांची ऑनस्क्रीन पत्नी माधवी भिडेची भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी मंदार यांना 80 हजार रुपये, तर सोनालिका यांना 35 हजार रुपये मिळतात.

Follow Us