अन्नू कपूर यांच्या ‘दूधिया बदन’ कमेंटवर तमन्ना भाटियाने सोडलं मौन; थेट म्हणाली..

अन्नू कपूर यांनी तमन्ना भाटियाच्या दिसण्यावरून कमेंट करताना 'दुधिया बदन' असा शब्दप्रयोग केला होता. त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता तमन्नाने पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

| Updated on: Oct 29, 2026 | 9:07 AM
1 / 5
अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या अभिनयासोबतच ग्लॅमरस अंदाजामुळेही नेहमी चर्चेत असते. मात्र, गेल्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी तिच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तमन्नाच्या रूपाबद्दल बोलताना अन्नू कपूर यांनी ‘दूधिया बदन’ (मिल्की बॉडी) असा उल्लेख केला होता. त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या अभिनयासोबतच ग्लॅमरस अंदाजामुळेही नेहमी चर्चेत असते. मात्र, गेल्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी तिच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तमन्नाच्या रूपाबद्दल बोलताना अन्नू कपूर यांनी ‘दूधिया बदन’ (मिल्की बॉडी) असा उल्लेख केला होता. त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

2 / 5

आता बराच काळ उलटल्यानंतर तमन्नाने या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘अशा गोष्टींना महत्त्व द्यायला लागलो, तर आपण आयुष्यात पुढेच जाऊ शकणार नाही,’ असं म्हणत तिने आपली भूमिका मांडली आहे. एनडीटीव्हीशी झालेल्या खास संवादादरम्यान तमन्नाला तिच्या रंगरूपाबद्दल करण्यात आलेल्या टिप्पणीविषयी प्रश्न विचारण्यात आला.

3 / 5

यावर उत्तर देताना तमन्ना म्हणाली की, एक क्रिएटिव्ह व्यक्ती म्हणून ऐकणं हे आपलं सर्वांत महत्त्वाचं काम आहे. मात्र, आपण ऐकलेल्या गोष्टींपैकी नेमकं काय स्वीकारायचं आणि कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं, याची समज असणंही तितकंच गरजेचं आहे. ती पुढे म्हणाली की, अशा टिप्पणींना आपण महत्त्व देऊ लागलो, तर आयुष्यात पुढे जाणं कठीण होईल.

4 / 5

त्यामुळे ती अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही. आपल्या कामावर, नवीन गोष्टी निर्माण करण्यावर आणि अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करणं, हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, असं तमन्नाने स्पष्ट केलं.

5 / 5

या वादाची सुरुवात 2025 मध्ये झाली होती. एका पॉडकास्टमध्ये अन्नू कपूर यांना तमन्ना भाटिया आवडते का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तमन्नाच्या लोकप्रिय ‘आज की रात’ या गाण्याचा संदर्भ देत त्यांनी तिच्या रूपाबद्दल ‘माशाल्लाह, क्या दूधिया बदन है’ अशी टिप्पणी केली होती. अन्नू कपूर यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला, तर काहींनी एखाद्या अभिनेत्रीच्या दिसण्यावर अशा प्रकारे टिप्पणी करणं योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us