टाटा मोटर्सचा नवा विक्रम! Punch आणि Nexon ची जबरदस्त क्रेझ; 10 महिन्यात 6.49 लाख गाड्यांची विक्री
एका वर्षात 6 लाख विक्रीचा टप्पा ओलांडत टाटा मोटर्सने नवा इतिहास रचला असून SUV आणि इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीची दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे.

10 महिन्यांत 6.49 लाख गाड्यांची विक्री: टाटा मोटर्सने जानेवारी ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत तब्बल 6,49,477 पॅसेंजर वाहनांची विक्री केली आहे. विशेष म्हणजे, कंपनीने 2025 मधील 5.73 लाख गाड्यांच्या एकूण विक्रीचा आकडाही मागे टाकला आहे.
Punch आणि Nexon ठरल्या ग्राहकांच्या आवडत्या: टाटा पंचने 1,82,269 युनिट्सच्या विक्रीसह पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नेक्सॉनने 1,74,524 युनिट्सची विक्री नोंदवत दुसरे स्थान मिळवले आहे. या दोन्ही SUV टाटा मोटर्सच्या यशाचे प्रमुख कारण ठरल्या आहेत.
SUV सेगमेंटचा वाढता दबदबा: पंच, नेक्सॉन, सिएरा, कर्व, हॅरियर आणि सफारी या SUV मॉडेल्सचा एकत्रित मार्केट शेअर 83 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी हाच आकडा 76 टक्के होता. त्यामुळे SUV गाड्यांकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याचे स्पष्ट होते.
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत 88 टक्क्यांची वाढ: टाटा मोटर्सने जानेवारी ते ऑक्टोबर 2026 दरम्यान 1,24,792 इलेक्ट्रिक कारची विक्री केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ तब्बल 88 टक्के आहे. कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा आता 20 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
वर्षाअखेरीस 7.9 लाख विक्रीचा अंदाज: ऑक्टोबर महिन्यात टाटा मोटर्सने 73,894 वाहनांची विक्री करत आतापर्यंतचा सर्वोच्च मासिक विक्रीचा विक्रम केला आहे. सणासुदीची मागणी, नवीन मॉडेल्सना मिळणारा प्रतिसाद आणि Battery-as-a-Service (BaaS) सुविधेमुळे वर्षाअखेरीस विक्रीचा आकडा 7.9 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.