
बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉयने आपली सहलीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये मौनी रॉयचा हॉट स्टाइल लूक पाहायला मिळत आहे. कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोझ देत काढलेले फोटो तिने शेअर केले आहेत.

'टेक मी बॅक' ही कॅप्शन लिहित. आकर्षक स्विमिंग सूट घालून स्वामिंगमध्ये निवांतपणाचा अनुभव घेतानाचे फोटो शेअर केले आहेत.

मौनी रॉय व सूरज नांबियारचे 27 जानेवारी 2022 रोजी मल्याळम आणि बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न झाले. गोव्यातील हिल्टन रिसॉर्टमध्ये मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.

सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोवर आहे. तिने शेअर केलेल्या मादक अदांमधील फोटोंवर चाहते हार्ट, स्माईलीच्या इमोजी पोस्ट करत आहेत.

मौनी रॉय आता डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्सच्या पाचव्या सीझनमध्ये जज कार्यरत असलेली दिसून येत आहे. यामध्ये तिच्यासोबत कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि अभिनेत्री सोनाली बेंद्र हे ही जज असलेले दिसून आले आहेत.