
विमान बहुतेक वेळ ऑटोपायलट मोडवरच असते - विमान लांबच्या प्रवासात बहुतांश वेळ ऑटो मोडवरच उडत असते.पायलट केवळ टेकऑफ, लँडींग आणि मॉनिटरिंग सिस्टीम हाताळताना मॅन्युअल मोडवर म्हणजे प्रत्यक्ष विमान चालवतात

एअर टर्ब्युलन्स खरेच धोकादायक असते ? - विमान उड्डाणाच्या वेळी हवेत एअर टर्ब्युलन्सचा अनुभव काही वेळा विमान प्रवास करणाऱ्यांना येतो. हवेत निर्वांत पोकळी तयार झाली की विमानाला योग्य उंचीवर न्यावे लागते. एअर टर्ब्युलन्स हे धोकादायक असते. अत्याधुनिक विमान या स्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीने तयार केलेली असतात, पायलटला ही स्थिती हाताळण्याचं प्रशिक्षण दिलेले असते.

ऑक्सीजन मास्कला लिमिटेड सप्लाय असतो ? - इमर्जन्सीत ऑक्सीजन मास्क प्रत्येक प्रवाशांच्या सीटवर उपलब्ध होतात. त्यात केवळ १२ ते १५ मिनिटांचा ऑक्सीजन असतो. हा वेळ पायलटसाठी विमानाला योग्य उंचीवर नेण्यासाठी हा वेळ पुरेसा असतो. त्यानंतर प्रवासी नॉर्मलपणे श्वास घेऊ लागतात.

पायलट प्रवाशांना दिलेले अन्न खात नाहीत ? -पायलटना प्रवाशांनाच दिलेला मेन्यू नसतो. त्यांचे जेवण स्वतंत्र बनवलेले असते. तर एवढंच काय दोन पायलटना देखील एकच जेवण दिले जात नाही. स्वतंत्र बनवलेले दिले जाते. या मागे फूड पॉयझन झाले तर निदान एक पायलट विमान सुरक्षितपणे लँड करु शकेल अशी योजना असते.

प्रत्यक्ष प्रवास अंतरापेक्षा जास्तीचे वेळापत्रक असते ? - विमान कंपन्या अनेकदा उड्डाणांच्या वेळा बदलत असतात. जेणेकरून उड्डाणे वेळेवर किंवा लवकर व्हावीत. जरी विलंब झाला तरीही. हा "ब्लॉक वेळ" हवाई वाहतूक किंवा हवामान परिस्थिती अशा संभाव्य समस्या लक्षात घेऊन ही ब्लॉक वेळ एडजस्ट केली जातो.